मम्मा, पप्पा, बहीण आणि मी अस छान चौकोनी कुटुंब होत आमचं. पप्पा सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचे, मग माझी आणि बहिणीची शाळा.सर्वांच्या वेळा वेगवेगळ्या. त्यामुळे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सुट्टीचे दिवस सोडले तर एकत्र व्हायचं नाही. म्हणूनच माझ्या मम्माचा एक अलिखित नियम होता.संध्याकाळचा नाश्ता सर्वांनी एकत्र करायचा.कितीही उशीर झाला तरी आम्ही सर्वच एकमेकांसाठी थांबून राहायचो.मम्मा मग मस्त गरमागरम कांदा पोहे, उपमा,कधी भाजी असे बरेच वेग वेगळे पदार्थ बनवून द्यायची.दिवसभर काय झाले कोणी काय केले या सर्व चर्चा आम्ही तेव्हा करायचो.
मम्मा तशी आम्हाला खुप लवकर सोडून देवाघरी गेली.पण आम्ही तिचा हा अलिखित नियम कधीच मोडला नाही.बालपणीच्या सुखद आठवणी पैकी ही एक गोड आठवण आहे.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


