प्रियाच्या आईला आता प्रियाच्या लग्नाचे वेध लागले होते. पण प्रियाला आईच्या लग्नाचा घाट घालायचा होता,पण तिच्या आईला हे मान्य नव्हते. प्रिया लहान असताना तिचे आई बाबा वेगळे झाले.पूर्वी अधेमध्ये बाबा यायचे भेटायला पण नंतर तेही येईनासे झाले. त्यांनी दुसर लग्न केलं आणि ते स्वतःच्या आयुष्यात रमले. पण आई मात्र प्रियाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात गुंतली होती. आईने तिच्यासाठी केलेल्या त्यागाची प्रियाला जाणीव होती. आपले लग्न झाले की आईचं काय होणार याची चिंता तर तिला होतीच पण आईला सुध्दा एक योग्य जोडीदार मिळावा हे मनापासून तिला वाटत होते. शेवटी आईला प्रियाच्या हट्टा पुढे झुकावेच लागले. आईला देखील प्रियाच्या पुरोगामी विचारांचे कौतुकच वाटले. अशारीतीने आईसाठी नवरा शोधण्याच्या कार्याचा प्रियाने शुभारंभ केला.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


