दिवाळी जवळ आली की सर्व गृहिणींची धावपळ सुरू होते. साफसफाई,रोषणाई,खरेदी या सोबतच गृहिणींना नेहमी चिंता लागलेली असते ती फराळाची.
लाडू, करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळी,शेव अशा कितीतरी पदार्थांची रेलचेल सुरू होते. फराळ बनवताना येणारी मज्जा सुध्दा निराळीच.या दिवसात घरातली मंडळी वेळात वेळ काढून एकत्र जमतात. गप्पा रंगतात. जुन्या नवीन गोष्टींचे आदान प्रदान होते. कदाचित जुन्या नवीन पिढीची सांगड घालण्यासाठी फराळाचा जन्म झाला असावा. प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देतो. मग अगदी चव चाखून बघण्याचे काम असो की तळण्या भाजण्याचे काम असो. प्रत्येक काम महत्त्वाचे.
प्रत्येक पदार्थाचा स्वाद वेगळा. तरीही प्रत्येक पदार्थ तितकाच हवाहवासा.. अगदी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती सारखा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


