गेल्या काही दिवसात कोरोनामुळे बरीच संकटं आली. त्यातलच एक म्हणजे बेरोजगारी.
अनंत असाच एक मध्यवर्गीय कुटुंबातील तरुण. सिव्हिल इजिनिअर. बाबांनंतर आईनेच सर्व सांभाळलं होत. कॉस्ट कटिंगमुळे अचानक त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हे कळल्यावर त्याचं जगच काही क्षणासाठी थांबलं. एज्युकेशन लोन कसे भरणार,घरच्या गरजा कश्या पूर्ण करणार,त्यातच लहान बहिणीच मेडिकलच दुसर वर्ष होतं. तिचीही फी भरण आलच. अनंतच्या नोकरीवर सारं काही अवलंबून होते. अनंतने बराच विचार केला, ही वेळ खचून न जाता विचारपूर्वक, प्रसंगानुरूप निर्णय घेण्याची आहे हे त्याने ओळखले. लहानपणापासूनच जेवण बनवण्याचा छंद असलेल्या अनंतने दुसरी नोकरी मिळेपर्यंत फूडस्टॉल लावायचे ठरविले. प्रसंगावधान दाखवून घेतलेल्या निर्णयाचे आई आणि बहिणीने स्वागतच केले. शेवटी म्हणतात ना परिसथिती कशीही असली तरी शो मस्ट गो ऑन.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


