Home » Marathi » 100 Words Stories » रात्रीच्या गर्भात…

रात्रीच्या गर्भात…

त्या रात्रीच्या गर्भात काय दडले होते याची त्या दोघींना कल्पनासुद्धा नव्हती. त्या नराधमाने योग्य संधी साधून तिच्या लेकीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. मुलीने मागचा पुढचा विचार न करता सूर्‍याने भोसकून त्याचा खून केला. आपल्या वासनापूर्तीसाठी अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या तिला आज चपराक बसली होती. तो तोच होता ज्याच्यासोबत मिळून तिने इतकी वर्ष आपल्या नवऱ्याला फसवले होते. कशीही असली तरी ती एक आई होती. मुलीच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेली घृणा तिला आज स्पष्ट दिसत होती. तिने खुनाचा आळ स्वतः वर घेतला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. खरतर आजवर केलेल्या या चुकीच्या कृत्याची तिला आज जाणीव झाली होती.

दुष्कर्माचा शेवट हा वाईटच होतो हेच खरं.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *