आज संविधान दिवस. आजच्या दिवशी भारतीय लोकांनी भारताचे संविधान स्वीकारले. या देशाची राज्यघटना लोकशाहीचा पाया आहे. या देशाची संस्कृती, परंपरा, वारसा, मूल्य, विचार जपण्याचे आणि आयुष्याचे तत्वज्ञान सांगण्याचे कार्य राज्यघटनेने केले आणि करत आहे.
फक्त उद्देश मोठा व चांगला असणे पुरेसे नाही, तर त्यास चांगल्या कृतीची जोड़ असेल तरच उद्देश परिपूर्ण होऊ शकतो.
कोणी दुसरी व्यक्ती येऊन आपला देश सुधारेल ही अपेक्षा करणं बंद करा.तक्रार करणे बंद करा. जर काही चांगल घडवायचं असेल तर सुरूवात स्वतः पासूनच करावी लागते.
चला तर मग नियम मोडणे बंद करू, लाच देणे- घेणे बंद करू. या देशासाठी, देशाचे नागरिक म्हणून काहीतरी योगदान करू.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


