अरेरे..स्वतःची काय ही अवस्था करून ठेवली आहे माणसाने!!मरण असंही स्वस्त झालंच होत.पूर्वी निदान काही लोक तरी यायची अंत्ययात्रेला.मेलेल्या माणसाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलायचे,थोडी हळहळ व्यक्त करायचे,आता तेही बंद झालं आहे.इन मीन चार जण येतात आता अंत्यविधीसाठी.
चला चार टाळकी येताना दिसताहेत..बघुया काय बोलत आहेत ते..अरे बापरे..ह्यांना तर काही सुख दुःखच नाही..डोळ्यात एक टिपूरपण नाही.काय म्हणताहेत ते..अरे देवा..हे त्या प्रेताचे नातेवाईकसुध्दा नाही.
अरे माणसा काय ही अवस्था तुझी.या कोरोनामुळे तरी तुला अक्कल आली असावी ही आशाच करू शकतो मी.प्रगती पथावर जाताना तू स्वतःच्या विध्वंसास कारणीभूत तर नाही ना ठरणार ..? जाऊ देत मला काय..मी तर नेहमी इथे असाचं राहणार आहे..
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


