साताऱ्याहून राधिका समरशी लग्न करून मुंबईला आली. तिच्यासाठी हे सगळंच नवीन होत. घरचं तिच जग बनलं होत. सर्वच गोष्टींसाठी ती समरवर अवलंबून असायची.
कंपनीच्या कामानिमित्त समरला सहा महिन्यांसाठी दुबईला जावं लागणार होत. राधिका हवालदिल झाली होती. आपण सर्व सांभाळू शकू का हा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. माहेरी जायचा पर्याय होता पण कधी ना कधी आपल्यालाच आपल बघावं लागेल हे समरने तिला समजावले.
तू प्रयत्न तर कर, काही लागलंच तर सर्व आहेतच,असे तो म्हणाला. तो गेल्यानंतर राधिकाकडे बराच फावला वेळ असायचा. त्यात ती नवनवीन गोष्टी शिकू लागली. ती स्वतः घराबाहेर जाऊ लागली. लोकांशी स्वतःहून संवाद साधू लागली. मुंबईत रमु लागली. सहा महिन्यानंतर समरला आत्मविश्वासाने भरलेली राधिका भेटली. तिला तसे पाहून त्यालाही खुप समाधान मिळाले.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


