ती इतर मुलींपेक्षा वेगळी होती.नटण्या मुरडण्यात तिला अजिबात रस नव्हता.तिचं वेगळेपण तिला जाणवतं होतं पण याचा नक्की अर्थ काय हेच तिला कळत नव्हतं.
वय वाढलं तेव्हा गोष्टी उमजू लागल्या.चुकीच्या शरीरात ती बंदिस्त झाली होती.पण कोणाला सांगायची सोय नव्हती.आई बाबांनासुध्दा कळत होतं सर्व पण त्यांना वळवून घ्यायचं नव्हत काहीच.कॉलेज मध्ये मुलं चिडवायची तिला.आत्मविश्वास असा नव्हताच तिच्यामध्ये.हे जग आपल्याला समजू शकणार नाही याची तिला भीती होती.घुसमट होत होती.
कॉलेज संपलं.घरच्यांनी परस्पर तिचं लग्न ठरवून टाकलं.आता प्रश्न स्वतःच्या अस्तित्वाचा आहे.जर आज विरोध नाही केला तर आपण स्वतःच स्वतःला कधी स्वीकारू शकणार नाही,आता हे सर्व आपण थांबवायला हवे हे तिचेच तिला उमजले.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


