राजीवला अर्धांवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या शरीराची एक बाजू निष्क्रिय झाली होती.सुमती आणि इतर घरच्यांची त्याच्यामुळे होणारी धावपळ आणि त्रास त्याला पाहवत नव्हते.स्वतःचे कुठलेच काम एकट्याने करू शकत नव्हता,त्यामुळे तो हरून गेला होता,चिडचिडा झाला होता.
योग्य उपचार केले तर राजीव पूर्ववत होऊ शकतो हे डॉक्टरने सुमतीला सांगितले.सुमतीचे राजीववर खुप प्रेम होतेच पण मुळ स्वभावसुध्दा जिद्दी होता.राजीवला बरे करायचे हे तिने मनाशी पक्के केले होते.थोडा धीर धर,सर्व नीट होईल,हे ती त्याला समजावत असे.
सुमती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.राजीव वर्षभरात स्वतःच्या पायावर उभा राहिला.राजीवमध्ये सुध्दा या प्रगतीमुळे आत्मविश्वास निर्माण झाला.त्यामुळे सुमतीचा आधार घेत तो प्रयत्न करू लागला.त्याला नवीन उमेद मिळाली होती.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


