तिचा स्वभाव,विचार त्याला आवडू लागले. दोघांच्याही जोडीदाराचं खुप वर्षापूर्वीच निधन झालं होत. त्यांच्या नंतर यांनी मुलांचे योग्य रीतीने संगोपन केले. आता मुले मोठी झाली, स्वतःच्या जगात रमली होती. सर्वांमध्ये असूनही हे दोघे मात्र एकटेच होते. आयुष्याच्या उत्तरायणात तिची सोबत असावी असे त्याला वाटत होते. त्याने तिला लग्नासाठी विचारले.
तिच्या मुलांच्या कानावर ही गोष्ट पडली. या वयात काय हे थेर म्हणून मुलं हिनवू लागली. तिला वाईट वाटले पण तिने निर्णय घेतला. मी हे लग्न करणार आहे. तुमचे बाबा गेल्यावर हे वैभव मी उभं केलं आहे. जर तुम्हाला माझी लाज वाटत असेल तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता,असे खडे बोल तिने मुलांना सुनावले. आईच्या तोंडून आत्मविश्र्वासाने भरलेले हे शब्द ऐकून मुले अवाक् झाली.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


