ए बाबा अजून मला लिहिता वाचता येत नाही. तस मी खूप खूप बोलतो पण ते काही तुम्हाला कळत नाही.. या जगात येण्या च्या आधी पासूनच मी तुला ओळखतो. मी आईच्या पोटात असल्यापासूनच तू माझे सर्व हट्ट पुरवत आला आहेस. आईच्या पोटावर हात ठेवून जेव्हा तू माझ्या शी गप्पा गोष्टी करायचास तेव्हा मला खूप मज्जा यायची म्हणून मग मी माझे हात पाय जोर जोरात हलवून तुला प्रतिसाद द्यायचो. या जगात आल्या नंतर मला सुखावणारा आणि आपुलकी देणारा पहिला स्पर्श तुझाच होता.आई च्या ही आधी तू मला जवळ घेतल होत. बाळ जगात आल्यावर त्याला सगळ्यात आधी त्याची आई कळायला लागते असं म्हणतात, पण मला माझा बाबा कळायला लागला होता. तू माझी घेत असलेली काळजी, मला हसवण्यासाठी तुझे चालले प्रयत्न मला कळतात आता. बाबा तू माझ्यासाठी एखाद्या सुपरहिरो पेक्षा कमी नाही आहेस.तू माझ्यासाठीआणलेली सर्व खेळणी मला खूप आवडतात.. आता मला अजुन अस मोठ्या माणसांसारखे बोलता नाही येत, पण बाबा माझं ना तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
एका लहान बाळाच त्याच्या बाबाबद्दलच मनोगत.👶


