Home » Marathi » Informative » प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरच्या प्रवासात फिजिओथेरपीची भूमिका.

प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरच्या प्रवासात फिजिओथेरपीची भूमिका.

Pregnancy म्हणजे प्रसूती पूर्व काळ.. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सुंदर काळ. इवल्या इवल्या पावलांची लागलेली पहिली चाहूल कुठलीच आई उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. तिच्या पोटात वाढणारा तो गर्भ म्हणजे जणू तिचं सर्वस्वच होऊन जातो. त्याच्या आगमनाची ती अगदी आतुरतेने वाट पाहत असते. त्याच्या संगोपनासाठी स्वतः ला तयार करत असते. पण खरंच तिची तयारी कधी पूर्ण होते का..?

या काळात स्त्री बऱ्याच बदलांना सामोरं जात असते. शारीरिक, मानसिक,भावनिक, होर्मनल असे बरेच बदल तिच्या शरीरात होत असतात. त्यामुळे तिला विशेष काळजीची गरज असते. आता ही काळजी म्हणजेच प्रसूती पूर्व म्हणजेच Antenatal Care आणि प्रसूती नंतर म्हणजेच postnatal care. ह्या Antenatal Care आणि postnatal care चाच एक भाग आहे Antenatal physiotherapy care आणि postnatal physiotherapy care.

हे फिजओथेरपिस्ट नक्की कोण असतात..?

फिजिओथेरपिस्टना मराठी मध्ये भौतिक उपचार तज्ञ असे म्हणतात तर फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार शास्त्र.. फिजिओथेरपी ही सुध्दा MBBS, BDS, आयुर्वेद, होमिओपॅथी यांच्या सारखीच वैद्यकीय विभागाची एक शाखा आहे. फिजिओथेरपिस्ट शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या व्याधींच योग्य निदान करून व्यायाम, वेग वेगळी इलेक्ट्रिकाल उपकरणे, manual therapy, टेप्पिंग, ड्राय नीडलिंग अशा अनेक वेग वेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करून व्याधी दूर करतात.

प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरचे फिजिओथेरपी उपचार म्हणजे नक्की काय ? त्यात काय केलं जातं ?

१) Education

फिजिओथेरपिस्ट गर्भवती स्त्रीला तिच्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक बदला बद्दल माहिती देतात. कुठल्या महिन्यात नक्की कोणता बदल अपेक्षित आहे हे सांगतात. मानसिक रित्या त्या स्त्री ला या पूर्ण प्रवासासाठी तयार करतात.

२)Posture.

जस जसे दिवस जाऊ लागतात तस तसे गर्भाच्या वाढीनुसार त्या गर्भवती स्त्रीचे पोट वाढू लागते, या वाढत्या पोटामुळे स्त्रीच्या posture मध्ये बरेच बदल होतात. Posture म्हणजे नक्की काय .. तर आपल्या शरीराची एक विशिष्ट ठेवणं असते, एका विशिष्ट प्रकारे आपण उभे राहतो, बसतो, चालतो… तर हि ठेवणं या दिवसात थोडी बदलते. कधी कधी वाढलेल्या पोटामुळ स्त्रिया नकळत पणे थोड वेगळं posture आत्मसात करतात. त्यामुळे काही काळा करता तर बर वाटत पण याचे पुढे येणाऱ्या काळात दुष्परिणाम दिसून येतात. अनेक प्रकारची दुखणी सुरू होतात. कधी कधी ही दुखणी इतकी वाढतात की साधं झोपणं ही शक्य होत नाही. तर ही वेळ येऊ नये यासाठी फिजिओथेरपिस्ट स्त्रियांना या योग्य posture कस असल पाहिजे याचे मार्गदर्शन करतात. अगदी कश्या प्रकारे झोपले पाहिजे , ते प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे या बद्दल माहिती देतात. हे posture maintain ठेवण्यासाठी काही व्यायाम शिकवतात. बाळ झाल्या नंतर ही त्याला कसे उचलायचे, त्याचे कपडे , nappy कशी बदलायची, ब्रेस्ट फीडींग कसे करायचे याबद्दल माहिती देतात. काय काय केलं पाहिजे या सोबतच काय नाही केलं पाहिजे या बद्दल ते सतत मार्गदर्शन करत असतात. तसेच जर हे योग्य posture maintain ठेवण्या साठी जर एखाद्या स्त्रीला assistive device ची गरज भासल्यास तेही ते पुरवतात. Wrong posture मुळे कुठला त्रास होऊ नये याची तर ते काळजी घेतातच पण त्याच सोबत जर काही त्रास झालं, काही दुखणी आली तर त्याच्या उपचारही करतात..

३)Active Range Of Motion Exercise And Strengthening.

आपल्या शरीरातले सर्व joints म्हणजेच आपले सांधे विशिष्ट मर्यादे मध्ये म्हणजेच range मध्ये move होत असतात. गरोदर पणात या सांध्यांमध्ये हॉर्मनाल changes मुळे शिथिलता आलेली असते. स्नायू कमजोर झालेले असतात. फिजिओथेरपिस्ट स्त्रीला अगदी माने पासून ते पायापर्यंत चे सांधे तसेच स्नायू यांचे व्यायाम कसे करायचे हे शिकवतात. जेणेकरून सांधे दुखणं, सांधे जखडण, स्नायू कमजोर होण अशा समस्या उद्भवत नाहीत.हात पायाच्या स्नायुची ताकद वाढवण्याचे कामही फिजिओथेरपिस्ट या दिवसात करतात. त्याचा फायदा डिलिव्हरी नंतर बाळाचे संगोपन करताना आईला होतो. बाळाला तासनतास उचलून घेताना तिला तसा फारसा त्रास होत नाही. तसेच शरीराचे वाढलेले वजन पेलण्याची ताकद पायचे व्यायाम केल्यामुळे पायात आलेली असते.याचा अजून एक फायदा म्हणजे जेव्हा आपण हे सर्व व्यायम करत असतो तेव्हा आपले स्नायू tone होण्यास मदत होते. त्यामुळे आपले शरीर ओबड धोबड होत नाही. आणि प्रसूती नंतर स्त्रियांना पूर्ववत व्यायला मदत होते..( मला वाटतं वजन कमी करण्यापेक्षा स्त्रियांचा खरा concern मी ओबड धोबड दिसले नाही पाहिजे, माझे शरीर योग्य मापात असले पाहिजे हा असतो. तर ह्या साठी फिजिओथरपी हा एक रामबाण उपाय आहे.)

४)Abdominal Muscles Exercise.

Abdominal muscles म्हणजेच पोटाचे स्नायू, ह्याची काळजी घेणं या काळात खुप गरजेचं असतं. अगदी first trimester पासूनच या पोटाच्या स्नायूंची काळजी कशी घ्यावी हे फिजिओथेरपिस्ट स्त्रियांना शिकवतात. झोपून , बसून हे व्यायाम कसे करावे याची माहिती देतात. आपल्या पोटाच्या पुढे rectus abdominis नावाची एक muscle असते. जसं जसं पोट वाढत जात तस तस हा स्नायू कमजोर होऊ लागतो आणि त्याचे दोन भागात विलगिकरण होऊ लागते. म्हणजेच separation होऊ लागतं. त्याच्या मेडिकल भाषेत Diastasis recti असे म्हणतात. थोड्या फार प्रमाणात हे प्रत्येक स्त्री मधे गरोदर पणात तसेच प्रसूतीच्या वेळी होते. हे विलगिकरण कमी प्रमाणात व्हावे आणि तसेच प्रसूती नंतर ते लवकरात लवकर भरून निघावे यासाठी फिजिओथेरपिस्ट स्त्रियांना मार्गदर्शन करतात. पोटाचे स्नायू कमजोर राहिले तर कंबर दुखी, hip पेन, मांडी जवळचे स्नायू दुखणे असे त्रास होत राहतात. तसेच प्रसूती नंतर स्त्रियांना पोट कमी करायला खूप अडचणी येतात. बरेचदा वजन कमी होते पण पोटाचा आणि कंबरे कडचा भाग कमी होत नाही.त्यामुळे abdominal muscles exercise करणे खूप गरजेचे असते.

५) Pelvic Floor Strengthening.

Pelvic floor म्हणजेच ओटी पोटाचा तळ. हा तळ गर्भ पिशवी, मूत्राशय,अंडाशय, गुप्तांग, काही स्नायू, ligaments ( अस्तीबंधन), हाड यांनी बनलेला असतो.ओटीपोटितल्या सर्व अवयवांचे रक्षण करण्याचा काम स्नायू, अस्तीबंध,आणि हाड करत असतात. गरोदर पणात स्त्री च्या शरीरात होणाऱ्या होर्मोनल बदलामुळे हे सर्व स्नायू, अस्तीबांध शिथिल होतात. तसेच vaginal delivery च्या वेळी या स्नायूंवर भरपूर ताण येतो. त्यामुळे हे स्नायू खुप कमजोर होतात. आणि ओटीपोटल्या अवयवांना संरक्षण देण्याचे जे त्यांचे काम आहे ते काम ते योग्य रित्या करू शकत नाहीत. बरेचदा स्त्री गरोदर पणात तसेच प्रसूती नंतर सतत लघवीला होत असल्याची, तिथे इन्फेक्शन होत असल्याचे, लघवी थांबवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याचे, कधी हसल्यावर , खोकल्यावर थोड्या फार प्रमाणात काही थेंब लघवी पडत असल्याची तक्रार करतात.तसेच पन्नाशी ओलांडल्यावर काही एखादा अवयव गुप्तांगतून खाली येत असल्याचे त्यालाच prolaspe असे म्हणतात अशी तक्रार करतात. हा prolapse जर खुप प्रमाणात असेल तर या परिस्थितीला शस्त्रक्रिये शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी pelvic floor muscles व्यायाम करायची आणि त्यांची ताकद वाढवण्याची गरज असते.

६) Breathing Exercises.

गरोदर पणात शरीराची ऑक्सिजन ची गरज वाढलेली असते. जसं जसं गर्भ वाढत जातो तसा तस् स्त्रीला श्वासोच्छ्वासच्या क्रियेतही खुप त्रास होतो. अशा वेळेला फिजिओथेरपिस्ट वेगवेगळे Breathing exercises शिकवून ही अडसर ही दूर करतात. तसेच vaginal delivery च्य वेळेला कधी श्वास घ्यायचा तर कधी तो सोडायचं या बद्दलही मार्गदर्शन करतात.

७) Relaxation Techniques.

बरेचदा स्त्रियांना या काळात anxiety, restlessness, झोप न येणे अशा समस्या उद्भवत . अशा वेळेला फिजिओथेरपिस्ट त्यांना Relaxation techniques शिकवून अशा समस्या सोडवण्यास मदत करतात.

या काळात फिजिओथेरपी उपचारांची गरज का असते ?

१) प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर फिजिओथेरपी उपचार घेतल्याने स्त्री शारीरिक तसेच मानसिक रित्या होणारी बदलांसाठी तयार होते.

२) प्रसूती पूर्व केलेल्या व्यायामामुळे तिच्या शरीरातले सर्व स्नायू tone झालेले असतात. त्यामुळे प्रसूती नंतर तिला तिची शरीर पुन्हा पूर्ववत करण्यास त्रास होत नाही.

३)या काळात जेवढं कमी औषधांचा वापर करता येईल याकडे स्त्रियांचे तसेच स्त्री रोग तज्ञांचे लक्ष असते. त्यामुळे एकदे दुखणे आलेच तर फिजिओथेरपिस्ट मदत करू शकतात.

४) प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर चे फिजिओथेरपी उपचार हे group sessions मध्ये होतात. तिथे स्त्रियांना ग्रुप exercise तर करता. येतातच पण त्याच बरोबर आपल्या सारख्या इतर स्त्रियांशी बऱ्याच गोष्टींवर बोलता येत , संवाद साधता येतो. आपल्या रूटीन आणि धकाधकीच्या जीवनात हा थोडासा बदल कधी कधी खुप मोलाचं ठरतो.

५) फिजओथेरपिस्ट स्त्रीला pregnancy, labour, delivery आणि postpregnancy या सर्व काळासाठी तयार करतात.

प्रसूती पूर्व फिजओथेरपी कधी सुरू करू शकतो ?

Pregnancy च्या ६ ते ८ आठवड्या पासून सुरू करू शकतो. पण यात स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्या स्त्री चे तसेच गर्भाचे आरोग्य तपासून तसा सल्ला देतात.शक्यतो स्त्री रोग तज्ञ first trimester नंतर किंवा पाचव्या महिन्या नंतर प्रसूती पूर्व फिजिओथेरपी सुरू करण्याची परवानगी देतात.

प्रसूती नंतर फिजिओथेरपी कधी सुरू होते ? Delivery च्या वेगवेगळ्या पद्धती वर हे अवलंबून असते ?कुठल्या conditions मध्ये प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर फिजिओथेरपी घेत नाहीत..?

१) आधी गर्भपात झाला असेल तर.

२) पिशवीचे तोंड मोठे असेल तर.

३) रक्तदाबाचा त्रास असेल तर.

४) हृदयाशी संबंधित आजार असेल तर

.५) श्र्वासनाशी संबंधित आजार असेल तर.

६) गरोदर पणात रक्तस्त्राव च त्रास होत असेल तर.

७) वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर.

८) स्त्री रोग तज्ञांची परवांगी नसेल तर.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

B.P. Th.Consultant Physiotherapist.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *