Home » Marathi » Poem » आजी

आजी

कुटुंबात असावी आजी. नातवंडांना शंभो घालणारी. चिऊ काऊचे घास भरवणारी. आपले बालपण पुन्हा जगणारी. स्वतः च्या मुलांचे जेवढे हट्ट पुरवले नाहीत तेवढे नातवंडांचे पुरवणारी. त्याचे खूप खूप लाड करणारी. नातवंडांना छान छान गोष्टी सांगणारी. भातुकलीच्या खेळात रमणारी. आई बाबाच्या मारा पासून वाचवणारी. भुर नेणारी. बालगीत, प्रार्थना शिकवणारी. कुटुंबात असावी एक आजी घराला घरपण देणारी.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *