असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.
मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.
त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.
आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.
वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.
लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.
लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.
स्वतः चा त्रास मुलांपासून लपवणारा.
मुलांना काही झाले तर सैरावैरा धावणारा.
सर्व परिस्थितीत ठाम उभ राहणारा.
मुलांना त्याचे दुःख दिसू नये म्हणून कोपऱ्यात जाऊन रडणारा.
मुलांना आयुष्यात मोठं होताना पाहून सुखावणारा.
समाजात जेव्हा त्याची ओळख मुलांच्या नावाने होते तेव्हा आनंदाने गहिवरून जाणारा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


