फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू.
रथाच्या पुढे घोडे चालत आहेत, हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व जाणवत आहे, अशा लक्ष्मी मातेला वंदन करू.
भूलाबाईचा उत्सव साजरा करू,सुख दुःख सारे बाजूला ठेऊ.
फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू.
स्वतःसाठी जरा नटूथटू ,स्वतः साठी जरा वेळ काढू.
पती राजाचे थोडे कौतुक करू, माहेर आणि सासरचे गोडवे गाऊ.
ह्या साऱ्यावर आपले किती प्रेम आहे हे त्यांना सांगू.
गाण्यातून भावनांना वाट मोकळी करू.
फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


