क्षण हे असे जे बरच काही देतात,
क्षण हे असे जे बरच काही घेऊन जातात,
क्षण हे असे जे मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
क्षण हे असे जे कधी सरुच नये असे वाटतात,
क्षण हे असे जे परत कधी येऊच नये असे वाटतात,
क्षण हे असे जे मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
क्षण हे असे जे तुझ्या गोड स्मृती घेऊन येतात,
क्षण हे असे जे मला तुझी वाट पाहायला लावतात,
क्षण हे असे जे मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.