माझ्या लहानपणी होते आमचे छोटेसे चाळीतले घर,
आताच्या दोन बेडरूम टेरेस फ्लॅटला सुध्दा नाही येणार त्याची सर.
त्या छोट्याश्या घरात खुप समाधान आणि समृद्धी होती.काळजी,चिंता,भीती या सर्वांची तिथे जागा नव्हती.
माझ्या लहानपणी चाळ नावाची वाचाळ वस्ती नव्हती.तिथे एकमेकांना मदत करणारी,कठीण प्रसंगी धावून येणारी,आनंदात सहभागी होणारी जीवाभावाची माणसे होती.
माझ्या लहानपणी प्रत्येक गोष्टीचे एक वेळापत्रक असायचे.पाणी कधी येणार,जेवायला कधी बसायचे,खेळायला कधी जायचे,अभ्यास कधी करायचे हे सर्व आधीच ठरलेले असायचे.
माझ्या लहानपणी मोबाईल फोन नव्हता,पण त्या ट्रिंगट्रिंगवाल्या फोनची मज्जा वेगळीच असायची.एकमेकांची खुशाली विचारायची ती तेव्हा सगळ्यात महागडी पद्धत वाटायची.
माझ्या लहानपणी मोठमोठाले सेलिब्रेशन नसायचे,पण जे असेल त्यात आम्हाला खुप समाधान मिळायचे.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

