२०२० जर व्यक्ती असती तर… एक कठोर शिक्षक.
२०२० मला एका कठोर शिक्षका सारख भासल. नवीन वर्ष आलं. सर्वांनी जल्लोषात स्वागतही केलं. प्रत्येक जण आपल्याच धुंदीत जगत होता.पण हे नवीन शिक्षक कठोर होते. त्यांना वाटल चला बघुया आपल्या या विद्यार्थ्यांची कठीण परीक्षा घेऊया. जीवनात अनपेक्षित प्रश्न,समस्या आल्यावर कसे वागतात ते पाहू. अनपेक्षित परीक्षेने सर्वांचीच तारांबळ उडाली. काही प्राणानां मुकले, काही नैराश्याच्या गर्तेत सापडले,…
