प्रत्येक कुटुंबात असते एक आई. तिच्या पिल्लाच्या पाठी सतत धावणारी. हे कर,ते करू नकोस असे सतत सांगणारी. छोट्या छोट्या चुकांसाठी रागवणारी. मोठे गुन्हे माफ करणारी…
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी “, शाळेत असताना परीक्षेत आईविषयी केव्हाही निबंध लिहायला आला की त्या निबंधाची सुरुवात याच ओळीने व्हायची. पण खरतर या ओळींचा खरा अर्थ तेव्हा कधी कळलाच नाही.