फराळ.
दिवाळी जवळ आली की सर्व गृहिणींची धावपळ सुरू होते. साफसफाई,रोषणाई,खरेदी या सोबतच गृहिणींना नेहमी चिंता लागलेली असते ती फराळाची.लाडू, करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळी,शेव अशा कितीतरी पदार्थांची रेलचेल सुरू होते. फराळ बनवताना येणारी मज्जा सुध्दा निराळीच.या दिवसात घरातली मंडळी वेळात वेळ काढून एकत्र जमतात. गप्पा रंगतात. जुन्या नवीन गोष्टींचे आदान प्रदान होते. कदाचित जुन्या नवीन पिढीची…
