कोरोनाचे८ महिने १० शब्दात
कोरोना आला, ठाण मांडून बसला.पण अजूनही माणूस नाही खचला. निसर्गाने समजावून सुध्दा माणूस काही समजेना,कोरोना काही जगातून जाईना. कोरोना ने दाखविले जगाचे नवे रूप,कधी वाटे सुंदर, तर कधी कुरूप. हातावरचे पोट भुकेने हळहळले,श्रीमंत मात्र डाएट,योगा कडे वळले. एकदा शेवटचे पाहण्यासाठी, आप्तेष्ट तरसले.अंत्यसंस्कार करणेही आता कठीण झाले. गृहिणीची धावपळ जवळून अनुभवली,तिच्या मॅनेजमेंट स्कीलची सर्वांनाच कमाल वाटली….

