100 Words Stories

ही वाट दूर जाते…

राखी आणि योगेश गोंडस मुलीचे आई बाबा झाले. आपल्या मुलीला आईबाबांच्या प्रेमासोबतच उत्तम संस्कार आणि शिक्षण मिळावे ही त्यांची इच्छा होती. मुलगी मोठी होत होती. तसतशी त्यांची चिंता वाढत होती. त्यांच्या बस्तीतलं वातावरण तिच्यासाठी योग्य नाही हे दोघानाही जाणवत होतं. बस्ती सोडून कुठेतरी चांगल्या ठिकाणी घर घेणे गरजेचे होते,” पण आपल्यासारखे हातावर पोट असणा-या माणसांना…

100 Words Stories

माझी माय.

लेकीचा अपघात झाल्याचे कळताच नर्मदाबाई धावतच तिच्या सासरी गेल्या. इंजुरी सिरीयस होती. नर्मदबाईंनी अगदी सहा महिने तिथे राहून लेकीच सर्व केले. तिला बरे करताना तिचे घरही सांभाळले. ती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर त्या निघाल्या. लेकीने त्यांचे पाय पकडले,ओक्साबोक्शी रडत म्हणाली,“आई मला माफ कर.सावत्र म्हणून मी नेहमीच तुझा अनादर केला.पण तू नेहमीच माया दिली.तुझा चांगुलपणा मला कधीच…

100 Words Stories

माझ्याकडे सुपर पॉवर असती तर…

माझ्याकडे सुपरपॉवर असती तर खरंच मी क्षणाचाही विलंब न करता माझे बालपण परत मिळवले असते. देवाघरी गेलेल्या माझ्या मम्माला देवाकडून परत मागून आणले असते. त्याला म्हणाले असते,” जन्म आणि मृत्यू शाश्वत सत्य आहे, ते मी मानते, पण अजून थोडा वेळ आम्हा मायलेकींना दे. तिच्या कुशीत थोडा वेळ मला विसावू दे. शाळेतल्या गमतीजमती तिला सांगू दे….

Poem

मुलगी – प्रत्येक आई बापाचं शंभर नंबरी सोनं.

मुलगी झाली हो, मुलगी झाली,तिच्या पावलांनी लक्ष्मी घरात आली. तिच्या हास्याने घरात सुख समाधान येईल,तिच्या पैजणांच्या तालावर समृध्दी,ऐश्र्वर्य घरात नांदेल. मोठी होऊन जेव्हा ती सासरी जाईल, तेव्हा माझे हे शंभर नंबरी सोनं तिथेही आपली चमक दाखवेल,सर्वांना आपला लाळा लावेल. तिच्या सद्गुणांनी त्या घराचंही नंदनवन बनवेल,माहेरची ती जान, तर सासरची ती शान बनेल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

नवीन सुरूवात..

प्रियाच्या आईला आता प्रियाच्या लग्नाचे वेध लागले होते. पण प्रियाला आईच्या लग्नाचा घाट घालायचा होता,पण तिच्या आईला हे मान्य नव्हते. प्रिया लहान असताना तिचे आई बाबा वेगळे झाले.पूर्वी अधेमध्ये बाबा यायचे भेटायला पण नंतर तेही येईनासे झाले. त्यांनी दुसर लग्न केलं आणि ते स्वतःच्या आयुष्यात रमले. पण आई मात्र प्रियाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात गुंतली होती….