Quotes

दुर्गा.

मंदिरात जाऊन दुर्गेची आराधना करण्याआधी घरातल्या, समाजातल्या तिच्या वेग वेगळ्या रुपांचा आदर केला तरी ती दुर्गा प्रसन्न होईल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आदिशक्ती..

ती आहे पार्वती, ती दुर्गा सुध्दा आहे. एकीकडे ती सुंदरतेचे,चंचलतेचे, नाजुकतेचे प्रतीक आहे,. तर दुसरीकडे ती धाडसी, रणरागिणी सुध्दा आहे. ती वाटते नाजूक, पण तीच आदिशक्ती आहे. नवनिर्मितीचा अधिकार आहे तिला, कारण ते पेलवण्याच सामर्थ्य सुध्दा तिच्यामध्येच आहे. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..- भाग १

(सत्य घटनेवर आधारीत) स्मिता लग्न होऊन खेडेगावातून मुंबईला आली. घरच्या परिस्थितीमुळे तीच शिक्षण दहावी पर्यंतच झालं होतं. तिचा नवरा राजेश बारावी शिकलेला. स्मिता आणि राजेश खुप समजूतदार होते. त्या दोघांच्याही त्यांच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या. एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यतीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. राजेश एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होता….