आणी तिला मोकळे झाल्यासारखे वाटले..
डॉक्टर साठेंची तृप्ती अभ्यासात साधारण होती, पण ती एक उत्तम नर्तिका होती. घरात सर्वच डॉक्टर्स, त्यामुळे तिनेही डॉक्टरच बनायचे हे साठे कुटुंबीयांचे आधीच ठरलेले. घरच्यांच्या आनंदासाठी तिने बारावी सायन्स केलेही. मेडिकलला एडमिशन घेण्याइतके मार्क्स नसतानाही डोनेशन भरून ऍडमिशन घेण्याची साठेंची तयारी झाली. तुप्तीला आता हे चुकीचे वाटू लागेल. तिने घरच्यांना सांगितले मला डॉक्टर व्हायचे नाही….



