माणुसकी..
२६ जुलै२००५ आजही त्या दिवसाच्या आठवणी ताज्या आहेत.मी तेव्हा पंधरा वर्षांची होते.माझ्या आयुष्यात मी पाहिलेली पहिली पूरपरिस्थिती.आभाळ फटल्यासारखा पाऊस कोसळत होता. मुंबापुरीची तुंबापुरी झाली होती.पहिल्यांदाच मुंबई थांबली होती. लोक जागोजागी अडकून पडले होते.प्रत्येकाला घर गाठायचे होते, पण बऱ्याच जणांना त्या रात्री ते शक्य झाले नाही.माणुसकी म्हणजे नक्की काय हे तो पर्यंत मूल्यशिक्षणात शिकले होते पण…


