100 Words Stories

जीवन

रेखाचा नुकताच घटस्फोट झाला होता. तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नव्हते. ती कशी अयोग्य जोडीदार आहे हे त्याने तिला वारंवार सांगितले होते. त्याच्या सततच्या सांगण्याने तिलाही आता ती कुठल्याच गोष्टीसाठी योग्य नाही असेच वाटू लागले होते. रेखाचे अवसानाच गळून गेले होते. तिचा आत्मविश्वास हरवला होता. तिची ही अवस्था तिच्या बाबांना बघवत नव्हती. एकेदिवशी त्यांनी तिच्या हातात…