Poem

मुलगी – प्रत्येक आई बापाचं शंभर नंबरी सोनं.

मुलगी झाली हो, मुलगी झाली,तिच्या पावलांनी लक्ष्मी घरात आली. तिच्या हास्याने घरात सुख समाधान येईल,तिच्या पैजणांच्या तालावर समृध्दी,ऐश्र्वर्य घरात नांदेल. मोठी होऊन जेव्हा ती सासरी जाईल, तेव्हा माझे हे शंभर नंबरी सोनं तिथेही आपली चमक दाखवेल,सर्वांना आपला लाळा लावेल. तिच्या सद्गुणांनी त्या घराचंही नंदनवन बनवेल,माहेरची ती जान, तर सासरची ती शान बनेल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Blogs

भोंडला..

भोंडला म्हणजे नक्की काय..! आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्‍या दिवशी हागदा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.काही ठिकाणी भोंडळा नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला…

100 Words Stories

तिचं आईपण – थोडंसं मनातलं

‘तिचा मुलगा बघ सर्व खातो, तिची मुलगी बघ किती ॲक्टिव आहे, जरा शिक तिच्याकडून बाळाला कस सांभाळायचं ते..’ अशा अनेक गोष्टी प्रत्येक आईला कमी अधिक प्रमाणात ऐकाव्या लागतात. त्यामुळे बरेचदा नव्याने आई झालेल्या तिच्यात न्यूनगंड निर्माण होतो. ‘मला हे आईपण पेलवेल ना? बाळाला माझ्यामुळे काही इजा तर होणार नाही ना?’ असे प्रश्न तिला पडतात. आईचा…

Poem

फेर धरू गं, फेर धरू ( भोंडल्याची गाणी)

फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू.रथाच्या पुढे घोडे चालत आहेत, हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व जाणवत आहे, अशा लक्ष्मी मातेला वंदन करू.भूलाबाईचा उत्सव साजरा करू,सुख दुःख सारे बाजूला ठेऊ.फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू. स्वतःसाठी जरा नटूथटू ,स्वतः साठी जरा वेळ काढू.पती राजाचे थोडे कौतुक करू, माहेर आणि सासरचे गोडवे…

Poem

दसरा.. – आपल्यातला रावण कुठवर जगणार?

दरवर्षी माणूस पुतळा रुपी रावणाचे माणूस दहन करतो पण त्याच्या अंतरी असलेला रावण मात्र त्याच्यावर हसतो.अरे माणसा.. तुझ्यात लपला आहे रावण, त्याला कोण मारणार?रोज कानावर बातमी येते स्त्री भ्रूण हत्येची, अत्याचाराची, बलात्काराची… तिचे लचके कुठवर तोडणार..?हे असे कधी पर्यंत चालणार..?प्रत्येक युगात तिला द्यावी लागली आहे अग्नी परीक्षा.. हा समाज तिला चरित्र हिन कुठवर ठरवणार ..?हे…

Stories

परदेशातला भोंडला..

. सुलभा काकू अमेरिकेत येऊन पाच महिने झाले होते. रमेश काका गेल्यानंतर त्या त्यांच्या मुलाकडे, पियूषकडे अमेरिकेत राहायला आल्या होत्या. तसं काका जाऊन आता दीड वर्ष होतं आलं होतं. काकांचं निधन झाल्यावर दोन महिन्यातच पियूषने काकूंनी त्याच्या सोबत अमेरिकेत येऊन राहायला सांगितले होते. पण काकू तयार नव्हत्या. पियूष सुध्दा हट्टी होता. तो काकूंनी घेऊन गेल्याशिवाय…

Poem

अक्कण माती चिक्कण माती या गाण्यावर आधारित – भोंडल्याचीगाणी

अक्कण माती चिक्कण मातीमाझी सासूबाई सुरेख गं,त्यांचे गोडवे किती गाऊ गं. माझी नणंद बाई सुरेख गं,तिचे कौतुक किती करू गं. माझे सासरे बुवा सुरेख गं,त्यांची स्तुती किती करू गं. माझे नवरोजी सुरेख गं,इश्श.. त्यांचे माझ्यावर खूप खुप प्रेम, त्यांचे किस्से किती सांगू गं. माझे सासर आहे सुरेख गं,किती गोष्टी सांगू गं. माझे माहेर आहे सुरेख…

Poem

विजयादशमी..

रावणावर रामाचा विजय म्हणजे विजयादशमी, महिषासुरावर दुर्गेचा विजय म्हणजे विजयादशमी, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय म्हणजे विजयादशमी, नवीन गोष्टींचा आरंभ म्हणजे विजयादशमी, पाप ,क्रोध, लोभ, मोह, मस्तर, मद,अहंकार, आळस, हिंसा, चोरी यांचा त्याग म्हणजे विजयादशमी. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

स्पर्धा

स्पर्धानलिनी सकाळी वैतागतच उठली. तिची आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती.पण तरी सुद्धा ती उठून आवरू लागली. मयुरेशने हे पाहिले. तो तिला म्हणाला देखील खूपच कंटाळा आला असेल तर जाऊ नकोस. एक दिवस आराम कर. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मयुरेशने ही मग तिला जास्त फोर्स केला नाही. त्यालाही आज उठायला उशीरच झाला होता….

Poem

बाबा..

असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.स्वतः चा त्रास मुलांपासून…