100 Words Stories

स्मशान..

अरेरे..स्वतःची काय ही अवस्था करून ठेवली आहे माणसाने!!मरण असंही स्वस्त झालंच होत.पूर्वी निदान काही लोक तरी यायची अंत्ययात्रेला.मेलेल्या माणसाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलायचे,थोडी हळहळ व्यक्त करायचे,आता तेही बंद झालं आहे.इन मीन चार जण येतात आता अंत्यविधीसाठी. चला चार टाळकी येताना दिसताहेत..बघुया काय बोलत आहेत ते..अरे बापरे..ह्यांना तर काही सुख दुःखच नाही..डोळ्यात एक टिपूरपण नाही.काय म्हणताहेत…

Quotes

दुर्गा.

मंदिरात जाऊन दुर्गेची आराधना करण्याआधी घरातल्या, समाजातल्या तिच्या वेग वेगळ्या रुपांचा आदर केला तरी ती दुर्गा प्रसन्न होईल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आदिशक्ती..

ती आहे पार्वती, ती दुर्गा सुध्दा आहे. एकीकडे ती सुंदरतेचे,चंचलतेचे, नाजुकतेचे प्रतीक आहे,. तर दुसरीकडे ती धाडसी, रणरागिणी सुध्दा आहे. ती वाटते नाजूक, पण तीच आदिशक्ती आहे. नवनिर्मितीचा अधिकार आहे तिला, कारण ते पेलवण्याच सामर्थ्य सुध्दा तिच्यामध्येच आहे. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

तिचे सौंदर्य.. – भाग २

क्रमशः तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. असंख्य वेदना होत होत्या तिला.गुडघ्या पासून ते पोटा पर्यंतचा भाग, उजवा हात , तसेच चेहेऱ्याच्या उजव्या बाजूचा थोडा फार भाग भाजला होता. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते हे तिला डॉक्टर्स काढून कळले. सध्या घरातल्या कोणालाच भेटायची परवानगी नव्हती. तिने सर्वात आधी विचारले,’ माझा नवरा कुठे आहे?’…

Stories

तिचे सौंदर्य.. भाग १

गोष्ट १९९० ची आहे. नरेश आज लग्नासाठी स्थळं पाहायला जाणार होता. अनुराधा नावं होते मुलीचे. तिचा फोटो पाहूनच तो वेडा झाला होता. ‘ही फोट मध्ये दिसते तशीच असेल तर लगेच लग्न करेन’, हे त्याने मनाशी पक्के केले होते. इथे अनुराधाच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. नरेश कढून अनुराधाला होकार मिळावा यासाठी तिच्या आईने…

100 Words Stories

उत्तरायण.

तिचा स्वभाव,विचार त्याला आवडू लागले. दोघांच्याही जोडीदाराचं खुप वर्षापूर्वीच निधन झालं होत. त्यांच्या नंतर यांनी मुलांचे योग्य रीतीने संगोपन केले. आता मुले मोठी झाली, स्वतःच्या जगात रमली होती. सर्वांमध्ये असूनही हे दोघे मात्र एकटेच होते. आयुष्याच्या उत्तरायणात तिची सोबत असावी असे त्याला वाटत होते. त्याने तिला लग्नासाठी विचारले.तिच्या मुलांच्या कानावर ही गोष्ट पडली. या वयात…

Quotes

दिवा.

लेकी सूनांचे कर्तुत्व पाहून, त्यांचे महत्त्व आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे.दिव्या सोबतच पणती सुध्दा घर तेजोमय करू शकते, हे आता सर्वांना उमजू लागले आहे.

Quotes

आईचा गोंधळ..

घालुनी आईचा गोंधळ, सर्व दुःख दारिद्र्य, ईडा पीडा दूर ने, हे साकडे तिला घालू,नवरात्रीतच नाही तर,पूर्ण वर्ष भर स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा आदर करण्याचा संकल्प घेऊ. ***************************************************************************************************************************** माहेरी असताना आईचा नेहमी होणारा गोंधळ पाहून ती कधी हसली, तर कधी वैतागली.पण स्वतःच्या मुलांच्या मागेपुढे करताना, आता तिला तिच्या आईच्या मनस्थितीची जाणीव होऊ लागली. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

उमेद

राजीवला अर्धांवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या शरीराची एक बाजू निष्क्रिय झाली होती.सुमती आणि इतर घरच्यांची त्याच्यामुळे होणारी धावपळ आणि त्रास त्याला पाहवत नव्हते.स्वतःचे कुठलेच काम एकट्याने करू शकत नव्हता,त्यामुळे तो हरून गेला होता,चिडचिडा झाला होता.योग्य उपचार केले तर राजीव पूर्ववत होऊ शकतो हे डॉक्टरने सुमतीला सांगितले.सुमतीचे राजीववर खुप प्रेम होतेच पण मुळ स्वभावसुध्दा जिद्दी होता.राजीवला बरे…

100 Words Stories

प्रयत्न

माझा दहा महिन्यांचा चिमुकला, गेले कित्येक दिवस स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्यांदा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा तो पटकन खाली पडला. त्याला रडू आले. मी त्याला जवळ घेऊन कुरवाळले. तो शांत झाल्यावर पुन्हा त्याला उभे केले. एव्हाना त्याचा विश्वास बसला होता त्याची आई त्याच्या जवळ आहे .ती त्याला काही होऊ देणार नाही. त्याने पुन्हा…