100 Words Stories

नवीन सुरूवात..

प्रियाच्या आईला आता प्रियाच्या लग्नाचे वेध लागले होते. पण प्रियाला आईच्या लग्नाचा घाट घालायचा होता,पण तिच्या आईला हे मान्य नव्हते. प्रिया लहान असताना तिचे आई बाबा वेगळे झाले.पूर्वी अधेमध्ये बाबा यायचे भेटायला पण नंतर तेही येईनासे झाले. त्यांनी दुसर लग्न केलं आणि ते स्वतःच्या आयुष्यात रमले. पण आई मात्र प्रियाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात गुंतली होती….

100 Words Stories

क्षितिज

क्षितिज म्हणजे फक्त एक भास,आकाश आणि जमिनीच्या भेटीचा तो असतो केवळ एक आभास. ***************************************************************************************************************************** आकाशात रंगांची उधळण करीत अस्ताला जाणारा सूर्य नेहमीच मनाला भावतो.क्षितिजावर त्याला रोखून ठेवावे इतका तो सुरेख वाटतो.आयुष्यातल्या सुंदर आनंदी क्षणांचेही असेच असते,खुप रोखावेसे वाटते त्यांना, पण आपल्या हाती काहीच नसते.

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

समीर आणि नेहाचे भांडण झाले. नेहा माहेरी गेली. नेहा रुसल्यावर तिची नेहमी समजूत काढणारा समीर आज रागावला होता. त्यामुळे त्यानेही या वेळी फोन न करण्याचा निर्णय घेतला. तिथे नेहा समीरच्या फोनची वाट पाहत होती. नेहाला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यावर कळले ती आई होणार आहे. तिने तडक घरी जायचे ठरविले.समीर घरी…

100 Words Stories

प्रसंगावधान.. शो मस्ट गो ऑन

गेल्या काही दिवसात कोरोनामुळे बरीच संकटं आली. त्यातलच एक म्हणजे बेरोजगारी.अनंत असाच एक मध्यवर्गीय कुटुंबातील तरुण. सिव्हिल इजिनिअर. बाबांनंतर आईनेच सर्व सांभाळलं होत. कॉस्ट कटिंगमुळे अचानक त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हे कळल्यावर त्याचं जगच काही क्षणासाठी थांबलं. एज्युकेशन लोन कसे भरणार,घरच्या गरजा कश्या पूर्ण करणार,त्यातच लहान बहिणीच मेडिकलच दुसर वर्ष होतं. तिचीही फी भरण…

Quotes

तारे

आकाशी लुकलुकणारे तारे, वाटती सुरेख सारे.परी मजसी भुरळ पाडती माझ्या बाळाचे चक्षु रुपी तारे. ***************************************************************************************************************************** तारे कधी लुकलुकणारे, कधी तुटणारे, स्वप्न सम वाटणारे.कधी चंद्राच्या प्रकाशात हरवणारे, तर कधी अमावस्येच्या रात्री प्रकाश देणारे, सवंगड्यांसारखी सोबत देणारे. ***************************************************************************************************************************** आई, कित्येक प्रसंगी मी तुला आठवत असते,बरेचदा त्या ताऱ्यांमध्ये मी तुझे अस्तिव शोधत बसते. ***************************************************************************************************************************** डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

क्षण

क्षण हे असे जे बरच काही देतात,क्षण हे असे जे बरच काही घेऊन जातात,क्षण हे असे जे मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. क्षण हे असे जे कधी सरुच नये असे वाटतात,क्षण हे असे जे परत कधी येऊच नये असे वाटतात,क्षण हे असे जे मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. क्षण हे असे जे तुझ्या…

Poem

स्वप्न

स्वप्न पाहताना सारं किती छान वाटतं, पण ती तुटल्यावर आजुबाजूच जग भयाण वाटतं. दिवसाढवळ्या स्वप्नात रमल्यावर बरेचदा सत्याचा विसर पडतो, स्वप्न आणि सत्य यांचीच आपण गफलत करत असतो. स्वप्नात आपण आपलं भविष्य शोधायचा प्रयत्न करत असतो, पण आज आपण वर्तमानात जगतोय याचाच आपल्याला विसर पडलेला असतो. स्वप्न जरूर पाहावी, सोबतच ती पूर्ण करण्याची जिद्द उराशी…

Quotes

चंद्र

विरहात जळणाऱ्या प्रियकराला, चंद्राला पाहून पडलेला प्रश्न…“आकाशातल्या चंद्राला पाहून मला तुझेच स्मरण का होते?,दुःखाची चव चाखून ही, हे माझे वेडे मन तुझ्याकडेच धाव का घेते?.” ***************************************************************************************************************************** कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राचे साैंदर्य एखाद्या निसर्ग प्रेमिला विचारा,तसेच कलेकलेने वाढणाऱ्या गर्भाचे सुख एखाद्या आईला विचारा. ***************************************************************************************************************************** हजारो ताऱ्यांच्या सहवासात राहून ही त्याने स्वतः चे वेगळे पण साऱ्यांना पटवून दिले.स्वतः…

Quotes

कोरोनाचे८ महिने १० शब्दात

कोरोना आला, ठाण मांडून बसला.पण अजूनही माणूस नाही खचला. निसर्गाने समजावून सुध्दा माणूस काही समजेना,कोरोना काही जगातून जाईना. कोरोना ने दाखविले जगाचे नवे रूप,कधी वाटे सुंदर, तर कधी कुरूप. हातावरचे पोट भुकेने हळहळले,श्रीमंत मात्र डाएट,योगा कडे वळले. एकदा शेवटचे पाहण्यासाठी, आप्तेष्ट तरसले.अंत्यसंस्कार करणेही आता कठीण झाले. गृहिणीची धावपळ जवळून अनुभवली,तिच्या मॅनेजमेंट स्कीलची सर्वांनाच कमाल वाटली….

Poem

पहिली भेट

आज ही आठवतोय तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते. त्यादिवशी जणू माझ्या अबोल स्वप्नातून कोणीतरी उचलून तुला प्रत्यक्षात आणले होते. क्षणातच पडले नव्हते तुझ्या प्रेमात, पण त्या दिवसापासून तुला नक्कीच गृहीत धरू लागले होते मी माझ्या विचारात. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.