Blogs

मी आई असले म्हणून काय झाले…

मी आई असले म्हणून काय झाले… मी आई असले म्हणून काय झाले, मला सुध्दा थकवा येतो. मला सुध्दा स्वतःसाठी वेळ हवा असतो. मला सुध्दा वाटत असच बिछान्यात लोळत पडावं. मला सुध्दा वाटत कधी तरी स्वतः साठीच जगावं. मला सुध्दा वाटत पतीसोबत काही प्रेमळ क्षण अनुभवावे. मला सुद्धा वाटत त्यासोबत लेट नाईट मुव्हिला जावे. आई झाले…

Stories

शिकवणारा क्षण

स्वरा हल्ली सतत कुठल्यातरी विचारात हरवलेली असायची. नुकतीच तिची अकरावी ची परीक्षा होऊन कॉलेज ला सुट्टी सुरू झाली होती. पण स्वरा ने जरा ही वेळ न दवडता बारावी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली होती. स्वरा म्हणजे विजय आणि रश्मी यांची लेक. विजय एका बँकेत नोकरी करत होता तर रश्मी छोट्याश्या प्रायव्हेट कंपनी…

Stories

.. बाबा होते म्हणून.

बघता बघता तो दिवस आला ज्याची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. राधाच लग्न. उद्या राधाच लग्न होत. आज संध्याकाळी तिला हळद लागणार होती. घरात चोहीकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. राधा मात्र तिच्या खोलीत शांत बसून होती. कालपर्यंत सार काही मनासारखं होत आहे,आता आपलं सहजीवन सुरू होणार आहे म्हणून अगदी आपल्याच धुंदीत वावरणारी…

Poem

गैरसमज

जीवनाच्या वाटेवर अजुन पर्यंत एकटं चालायची सवय नव्हती,पण आता करावी लागेल.तुझ्याविना आता हे पहाडा एवढं आयुष्य मला एकटच जगावं लागेल.तुझ्यात आणि माझ्यात सुरू असलेले हे गैरसमजच पर्व कदाचित आता कधीच संपणार नाही.कळत नकळत पने तू मला किती दुखावले आहेस हे तुला कधीच कळणार नाही.

baby
Quotes

हिरवळ

बाळाचे हास्य भासे मज, जणू वसंतातली हिरवळ,थकलेल्या, ओशाळलेल्या दिवसांमध्ये दूर करते ते माझ्या मनावरची मरगळ. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

थँक्यू कोरोना – एका आईचे पत्र.

कोरोना कोरोना.. सध्या बघावं तिथे, ऐकावं तिथे फक्त तुझाच बोभाटा आहे. तशी तुझी आणि माझीओळख नाही आहे. आपण आतापर्यंत कधीच संपर्कात आलो नाही. खरतर आपली ओळख नसेलीच बरी. आपण कधीही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये हे अगदी मनापासून वाटते मला. देव करो आणि तसेच झाले पाहिजे. पत्राच्या सुरुवातीला प्रिय, आदरणीय वैगरे वैगरे लिहिण्याची पद्धत आहे. पण…

Quotes

पक्षी

अनेकदा वाटते आपल्यालाही आकाशात उडता यावे,मनाला वाटेल त्या प्रांतात मुक्त संचार करत सुटावे.रोटी, कपडा, मकान यांचे टेन्शन नसावे,एक दिवस तरी पक्षी म्हणून जगता यावे. ***************************************************************************************************************************** पिंजऱ्यात बंधिस्त असणाऱ्या पक्ष्याचं दुःख आता कोरोना मुळे घरात अडकलेल्या माणसाला थोड थोड कळू लागलं आहे. ***************************************************************************************************************************** डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

गाव.

वाढत्या शहरी करणाच्या बाजारात जागेचे भाव वाढत गेले.या सर्व गर्दीत, निसर्गाच्या सानिध्यात बहरलेले गाव हरवत गेले. ***************************************************************************************************************************** आपल्या चिमुकल्याला चंद्रा बद्दल सांगताना आई म्हणते,अंधाऱ्या रात्रीत जो आपला शितल प्रकाश देतो चांदोबा आहे त्याचे नाव,आकाशात ढगांच्या पलीकडे आहे सुंदरसे त्याचे गाव. ***************************************************************************************************************************** डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

…ती असते आई

क्षणभरासाठी असते ती पत्नी, अनंत काळाची असते ती आई.बाळाचे चरित्र घडवत असताना स्वतः चे अस्तित्व विसरून जाते ती असते आई. कधी ओरडते, कधी प्रेमाने जवळ घेते ती असते आई.छोट्या चुकीसाठी कान पकडते, पण मोठे अपराध सुध्दा स्वतः च्या पोटात घेते ती असते आई, हसते, हसविते, रडते,कधी बागडते, कधी पडते, कधी धडपडते,कधी चुकते, सतत नवीन काही…

Blogs

माहेर

माहेर… प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळचा विषय. अगदी नवविवाहित असो की वयस्कर प्रत्येकीच्या मनाचा हळुवार कोपरा म्हणजे माहेर. माहेर म्हणजे आठवणींचा खजिना. सासरपेक्षा श्रीमंत असो की गरीब पण प्रत्येक स्त्रीसाठी ते नेहमी खास असतं. आई, बाबा, बहीण, भाऊ हे तर जवळचे असतातच, पण त्या घरच्या भिंती, छप्पर, भांडी कुंडी यांमध्ये पण तिच्या आठवणी लपलेल्या असतात. माहेरी…