Blogs

सिझेरियन -भाग २

सिझेरियन हे कुठल्याही स्त्री ला आयुष्य भरासाठी मिळणारे आणि कधीही दुसऱ्याला सांगता न येणारे दुखणे आहे. ती दिसायला अगदी धडधाकट असते पण तिचे शरीर आतून किती पोकळ झाले आहे हे फक्त तिलाच ठाऊक असते. सिझेरियनच्या आधी भुल देण्यासाठी इंजेक्शन तिला देण्यात येते. त्या इंजेक्शन नंतर कंबरे पासून खालचा भाग सुन्न होतो आणि ही शस्त्रक्रिया पार…

Blogs

सिझेरियन -भाग १

कुठल्याही स्त्री ची प्रसूती झाल्यानंतर जेव्हा तिच्या नातलगांना गोड बातमी देण्यासाठी फोन केला जातो तेव्हा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे,’ डिलिव्हरी कशी झाली? नॉर्मल झाली की सिझेरियन’ . सिझेरियन झाले असेल तर काही ठिकाणी तर अस वातावरण निर्माण होत की, जणू काही खुप मोठी आपत्ती कोसळली आहे. ‘तुम्ही सिझेरियन होऊच कस दिलं’, ‘हे डॉक्टर तर…

Quotes

आठवण

आई.. तू जाऊन बरीच वर्ष झाली, तरी तुझ्या सर्व गोष्टी तुझी आठवण म्हणून मी आजही जपून ठेवल्या आहेत.आयुष्याच्या कित्येक वळणावर, सुखं दुःखाच्या प्रसंगी त्याच माझ्या सोबती बनल्या आहेत. ***************************************************************************************************************************** घरातला जुना फोटोज् चा अल्बम म्हणजे आठवणींचा खजिना,कितीही वेळा पाहिले तरी मन काही भरेना. ***************************************************************************************************************************** माझ्या आठवणींचा सडा कधीतरी तुझ्या अंगणी पडेल का?माझ्या अबोल भावना व्यक्त…

Poem

बायको आणि नवरा #acrossthebridge

प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी….

Poem

आजी

आता ती थोडी बदलली आहे.आजही ती संस्कार, परंपरा, मूल्य यांचं शिक्षण देते,पण आता तिची स्मार्ट फोन शी गट्टी जमली आहे.आजही तिच्या प्रेमळ कुशीत मायेची ऊब मिळते,पण आता तिने नऊवरी बरीच मागे सोडली आहे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आठवणीतला पाऊस..

आज पावसात भिजताना फार एकटं वाटतं होत.जुन्या आठवणींच सावट पुन्हा एकदा मनात दाटल होत.आजचा पाऊस अगदी आगंतुक पाहुण्यासारख आला, आणि माझ्या हृदयात कधीकाळी शिरकाव करणाऱ्या त्या आगंतुक पाहुण्याची मला आठवण करून गेला. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आजी

आता ती थोडी बदलली आहे.आजही ती संस्कार, परंपरा, मूल्य यांचं शिक्षण देते,पण आता तिची स्मार्ट फोन शी गट्टी जमली आहे.आजही तिच्या प्रेमळ कुशीत मायेची ऊब मिळते,पण आता तिने नऊवरी बरीच मागे सोडली आहे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आजी

कुटुंबात असावी आजी. नातवंडांना शंभो घालणारी. चिऊ काऊचे घास भरवणारी. आपले बालपण पुन्हा जगणारी. स्वतः च्या मुलांचे जेवढे हट्ट पुरवले नाहीत तेवढे नातवंडांचे पुरवणारी. त्याचे खूप खूप लाड करणारी. नातवंडांना छान छान गोष्टी सांगणारी. भातुकलीच्या खेळात रमणारी. आई बाबाच्या मारा पासून वाचवणारी. भुर नेणारी. बालगीत, प्रार्थना शिकवणारी. कुटुंबात असावी एक आजी घराला घरपण देणारी. डॉ….

100 Words Stories

कायापालट.. एक नवीन सुरुवात.

अनामिका..आज स्वतःला संपवायचे या विचारानेच घराबाहेर पडली होती. नुकतंच शिक्षण पूर्ण झालेली, दिसायला देखणी, लाघवी, हुशार, काहीतरी वेगळं करून दाखवेल असे सर्वांना जीच्याबद्दल वाटायचे अशी नेहा आणि आशिष यांची एकुलती एक लेक म्हणजे अनामिका. महिनाभरा पूर्वी प्रेमभंग झाला होता तिचा. ते सहन होते नव्हते तीच्याने. म्हणून आज स्वतः संपवायला निघाली होती.वाटेत तिची नजर एका अपंग…

Blogs

मदत

दुपारी साधारण अडीच-तीनच्या सुमारास दिवाणखान्यातून कसला तरी आवाज आला. मी स्वयंपाक घरातूनच डोकावून पाहिले. खिडकीबाहेर एक कबुतर अडकले होते. त्याला मदत करण्यासाठी मी बाहेर आले. खिडकीला बाहेरून जाळी असल्यामुळे मला आतून काही विशेष करताही येत नव्हते. त्या कबुतराला नक्की काय झाले आहे हे सुध्दा मला कळत नव्हते. तरी मी इथून आतून मला काही मदत करता…