100 Words Stories

मैत्री

मैत्री.. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटते. हे एक असे नाते जे जात – पात,धर्म, वय, नाती गोती, लिंग, भाषा सर्वांच्याशी पलिकडेचे तरी सर्वात जवळचे.काही सवंगडी येतात आपल्या आयुष्यात आणि त्यांचा कार्य भाग संपला की निघूनही जातात.पण काही असतात खूप खास.. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देतात. आपल्या चुकांसाठी समजावतात,ओरडतात वेळप्रसंगी कान पिळतात, अगदी शिव्या देतात….

Quotes

पणती.

एका छोट्याश्या पणतीचा प्रकाश सुध्दा अंधारात आधार देतो, तसेच सकारात्मक विचार नेहमी आशावादी राहण्यास मदत करतात. ©️®️ डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

ऊन.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख दुःखाचे क्षण हे अगदी ऊन आणि सावली सारखे असतात. जसं ऊन सरून सावली येतेच तसेच दुःख संपून सुख हे येतच, हा विचार मनात ठेऊन आपण नेहमी प्रयत्नशील, आणि आशावादी राहावे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

नवरा.

लग्न झाले आणि नवरा नावाचे पात्र आले माझ्या आयुष्यात,त्यांच्या येण्याने जाणवले, नक्की कसली उणीव होती माझ्या या प्रवासात. मी स्वच्छंदी, तो अगदी जबाबदरीने वागणारा.मी थोडी चिडकी, तो सर्व परिस्थिती शांतपणे हाताळणारा.मी थोडी अस्ताव्यस्त, तो अगदी नीटनेटकेपणे जगणारा.मी थोडीशी वेंधळी ,तो जपून पावलं टाकणारा.कधी मला हसवणारा, कधी माझ्या सोबत हसणारा.कधी मला समजवणारा, तर कधी वादविवाद करणारा.मी…

Quotes

शस्त्र.

माणसाने शब्द नेहमी जपून वापरावेत, कारण शब्दांसारखे शस्त्र नाही. ते एखादं युद्ध सुरू ही करू शकतात किंवा सुरू असलेले युद्ध थांबवू ही शकतात. **************************************************** लेखणी हे कुठल्याही लेखकाचे शस्त्र असते. मोम्सप्रेसो ने असंख्य लेखिकांना एक व्यासपीठ देऊन त्यांच्या लेखणी रुपी शस्त्रच्या ताकदीची त्यांना अनुभुती करून दिली. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

सोनं

ज्ञान, परिश्रम आणि सद् विवेक बुध्दीच्या जोरावर माणूस मिळालेल्या संधीच सोनं करू शकतो. **************************************************** पालकांना त्यांच्या चिमुकल्यांसोबत घालवलेला काळ हा सोन्यासारखाच भासतो. **************************************************** शेतकरी शेतात स्वतः चा घाम गाळून धान्य रुपी सोनंच पिकवत असतो. त्या अन्नाचा आणि शेतकऱ्यांचा आपण आदर केला पाहिजे. **************************************************** जेव्हा योग्य व्यक्ती जोडीदार म्हणून लाभतो तेव्हा संसारातील प्रत्येक क्षण सोन्यासारखा लख्ख…

Quotes

दुर्गा.

मंदिरात जाऊन दुर्गेची आराधना करण्याआधी घरातल्या, समाजातल्या तिच्या वेग वेगळ्या रुपांचा आदर केला तरी ती दुर्गा प्रसन्न होईल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

दिवा.

लेकी सूनांचे कर्तुत्व पाहून, त्यांचे महत्त्व आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे.दिव्या सोबतच पणती सुध्दा घर तेजोमय करू शकते, हे आता सर्वांना उमजू लागले आहे.

Quotes

आईचा गोंधळ..

घालुनी आईचा गोंधळ, सर्व दुःख दारिद्र्य, ईडा पीडा दूर ने, हे साकडे तिला घालू,नवरात्रीतच नाही तर,पूर्ण वर्ष भर स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा आदर करण्याचा संकल्प घेऊ. ***************************************************************************************************************************** माहेरी असताना आईचा नेहमी होणारा गोंधळ पाहून ती कधी हसली, तर कधी वैतागली.पण स्वतःच्या मुलांच्या मागेपुढे करताना, आता तिला तिच्या आईच्या मनस्थितीची जाणीव होऊ लागली. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

आकाश

आकाशी चमकतात चंद्र, सूर्य अन् तारेमाझ्या चिमुकल्याच्या लीला पाहण्यात हल्ली दंगुन जातो आम्ही सारे. ***************************************************************************************************************************** आकाशाचा विस्तार पाहून मन थक्क होऊन जातं,यशाची शिखरे पादाक्रांत करताना येणाऱ्या असंख्य आव्हानांची जणू ते जाणीव करून देतं. ***************************************************************************************************************************** एकदा चंद्र आणि सूर्य एकमेकांशी जुंपले,मीच श्रेष्ठ म्हणत ठेंभा मिरवू लागले.ग्रह तारे,पक्षी झाडे सर्व त्यांच्यावर हसू लागले,आकाशाच्या आधाराशिवाय तुमच्या असण्याला अर्थच…