Stories

माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २

दुसऱ्या दिवशीची पहाट साजिरीसाठी असंख्य प्रश्न घेऊन आली.. ” खरंच मला विक्रम बद्दल काय वाटतं..? पण हा विचार का करते आहे मी..? माझं आधीच ठरलं आहे प्रेम विवाह नाही करायचा.. आई बाबा म्हणतील तिथेच लग्न करायचं.. पण विक्रमची सोबत … आवडते मला.. त्याचा सहवास आवडतो, त्याच्या सोबत असताना वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही…

Stories

रेमंड.. द कंप्लीट मॅन..

श्रावणी आणि श्रीधरचे लग्न आता दोन महिन्यांवर येऊन ठेपले होते. श्रावणी २७ वर्षांची तर श्रीधर ३० चा. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. मनमिळावू, मितभाषी, राजबिंडा श्रीधर तर थोडीशी लाजाळू,स्वच्छंदी, हसतमुख श्रावणी. दोघांच्याही आया बालपणीच्या मैत्रीणी. सारच काही तस जुळून ही आलं अन् योग्य ही वाटलं म्हणून या दोघांचं लग्न ठरलं. हे टीपिकल अरेंज मॅरेज नव्हते. पण श्रावणी…

Stories

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..- भाग १

(सत्य घटनेवर आधारीत) स्मिता लग्न होऊन खेडेगावातून मुंबईला आली. घरच्या परिस्थितीमुळे तीच शिक्षण दहावी पर्यंतच झालं होतं. तिचा नवरा राजेश बारावी शिकलेला. स्मिता आणि राजेश खुप समजूतदार होते. त्या दोघांच्याही त्यांच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या. एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यतीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. राजेश एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होता….

Stories

त्या दोघी – भाग २

क्रमशः दुसरा दिवस उजाडला. अनघा काकू आज लवकरच उठल्या होत्या. सर्वांचा नाश्ता आणि रोहित आणि मीराच्या डब्ब्यांची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. मीरा तिच्या नेहमीच्या वेळेत स्वयंपाक घरात आली. पाहते तर सासू आधीच हजर. आता पुन्हा काहीतरी ऐकव लागणार असे तिला वाटले. दिवसाची सुरुवातच खराब होणार असे ती मनोमन पुटपुटली. पण झाले उलट. काकू…

Stories

त्या दोघी – भाग १

( या कथेत सासू सुनेच्या नात्याची एक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.) हल्ली अनघा काकू थोड्या चिंतेतच असायच्या. त्याच्या लाडक्या लेकाच, रोहितचं लग्न होत.जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तशी त्यांची चिंता वाढतच चालली होती. त्यांची होणारी सून, मीरा त्यांच्या परिचयाची होती. रोहितचं हे अरेंज कम लव्ह मॅरेज होतं. मीरा इंटेरियर डिझाईनर होती….

Poem

बायको आणि नवरा #acrossthebridge

प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी….