रात्रीच्या गर्भात…
त्या रात्रीच्या गर्भात काय दडले होते याची त्या दोघींना कल्पनासुद्धा नव्हती. त्या नराधमाने योग्य संधी साधून तिच्या लेकीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. मुलीने मागचा पुढचा विचार न करता सूर्याने भोसकून त्याचा खून केला. आपल्या वासनापूर्तीसाठी अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या तिला आज चपराक बसली होती. तो तोच होता ज्याच्यासोबत मिळून तिने इतकी वर्ष आपल्या नवऱ्याला फसवले…
