Stories

परदेशातला भोंडला..

. सुलभा काकू अमेरिकेत येऊन पाच महिने झाले होते. रमेश काका गेल्यानंतर त्या त्यांच्या मुलाकडे, पियूषकडे अमेरिकेत राहायला आल्या होत्या. तसं काका जाऊन आता दीड वर्ष होतं आलं होतं. काकांचं निधन झाल्यावर दोन महिन्यातच पियूषने काकूंनी त्याच्या सोबत अमेरिकेत येऊन राहायला सांगितले होते. पण काकू तयार नव्हत्या. पियूष सुध्दा हट्टी होता. तो काकूंनी घेऊन गेल्याशिवाय…