100 Words Stories

रात्रीच्या गर्भात…

त्या रात्रीच्या गर्भात काय दडले होते याची त्या दोघींना कल्पनासुद्धा नव्हती. त्या नराधमाने योग्य संधी साधून तिच्या लेकीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. मुलीने मागचा पुढचा विचार न करता सूर्‍याने भोसकून त्याचा खून केला. आपल्या वासनापूर्तीसाठी अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या तिला आज चपराक बसली होती. तो तोच होता ज्याच्यासोबत मिळून तिने इतकी वर्ष आपल्या नवऱ्याला फसवले…

100 Words Stories

हेच आहे का माझ्या नशिबात…

यामिनी आजही अशोकशी भांडत होती. ” कुठे नशीब फुटलं, तुमच्यासारख्या पोलिसाशी लग्न केलं मी. ना सणवार, सुखदुख. माझं सोडा पण निदान आज मुलाच्या वाढदिवसादिवशी तरी वेळेत यायचं घरी. माझ्या नशिबी हेच आहे हे मान्य केलं आहे मी,पण मुलाचा तरी विचार करायचा.” अशोक आजही शांतपणे तिला सॉरीच म्हणाला. छोटा अमोघ सर्व ऐकत होता. तो धावतच यामिनिकडे…