मुलगा झाला म्हणजे पालक म्हणून जबाबदारी संपते का..?
नंदिनी दोन गोड मुलांची आई. मोठा अर्जुन सहा वर्षाचा , तर छोटा आरव तीन वर्षांचा. ती प्राध्यापिका होती… राज .. तिचा नवरा.. बँकेत मॅनेजर. राज आणि नंदिनीचे छानस चौकोनी कुटुंब होते.. सासू सासरे गावाकडे राहायचे. नंदिनीचे माहेर सुध्दा दुसऱ्या शहरात होते.. अधून मधून ते भेटायला येत असत. कधी हे चौघे तिथे जात. सर्वच खुप छान…
