100 Words Stories

कोणे एके काळी..

वाघाची गोष्ट वाघ,वाघीण आणि तीन बछड्यांसोबत चुकून मानवी वस्तीत शिरला.एकच गोंधळ माजला.लोकांनी त्यांच्यावर मिळेल त्याने वार करायला सुरुवात केली.वाघीण जखमी झाली.ते पाचही जण कसेबसे वस्तीतून बाहेर पडले.वाघिणीला रक्तबंबाळ झालेले पाहून बछडे रडू लागले. रडत वाघाला म्हणाले, ” बाबा माणूस कसा कुटुंबासाठी घर बांधतो.तुम्ही आमच्यासाठी घर का नाही बांधलं?आज आपलं घर असतं तर आपण भटकलो नसतो.आईला…

100 Words Stories

खरा दागिना..

सुमितला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली होती पण अर्धीच. अर्धी फी त्याला भरावी लागणार होती.” सर्व मेहेनत वाया गेली. अर्धी फी नाही भरू शकणार मी,”असे सुमित त्याच्या मित्राला सांगत असताना त्याच्या खोलीच्या दाराशी उभे असलेल्या आईने ऐकले. सुमित खुप हुषार, मेहनती, समजूतदार होता.आईने तिचे स्त्रीधन विकले. तरीही पैसे अपुरे पडत होते. मग आईने त्याच्या वडिलांची शेवटाची…

100 Words Stories

आणी तिला मोकळे झाल्यासारखे वाटले..

डॉक्टर साठेंची तृप्ती अभ्यासात साधारण होती, पण ती एक उत्तम नर्तिका होती. घरात सर्वच डॉक्टर्स, त्यामुळे तिनेही डॉक्टरच बनायचे हे साठे कुटुंबीयांचे आधीच ठरलेले. घरच्यांच्या आनंदासाठी तिने बारावी सायन्स केलेही. मेडिकलला एडमिशन घेण्याइतके मार्क्स नसतानाही डोनेशन भरून ऍडमिशन घेण्याची साठेंची तयारी झाली. तुप्तीला आता हे चुकीचे वाटू लागेल. तिने घरच्यांना सांगितले मला डॉक्टर व्हायचे नाही….

100 Words Stories

माझ्याकडे सुपर पॉवर असती तर…

माझ्याकडे सुपरपॉवर असती तर खरंच मी क्षणाचाही विलंब न करता माझे बालपण परत मिळवले असते. देवाघरी गेलेल्या माझ्या मम्माला देवाकडून परत मागून आणले असते. त्याला म्हणाले असते,” जन्म आणि मृत्यू शाश्वत सत्य आहे, ते मी मानते, पण अजून थोडा वेळ आम्हा मायलेकींना दे. तिच्या कुशीत थोडा वेळ मला विसावू दे. शाळेतल्या गमतीजमती तिला सांगू दे….

100 Words Stories

हेच आहे का माझ्या नशिबात…

यामिनी आजही अशोकशी भांडत होती. ” कुठे नशीब फुटलं, तुमच्यासारख्या पोलिसाशी लग्न केलं मी. ना सणवार, सुखदुख. माझं सोडा पण निदान आज मुलाच्या वाढदिवसादिवशी तरी वेळेत यायचं घरी. माझ्या नशिबी हेच आहे हे मान्य केलं आहे मी,पण मुलाचा तरी विचार करायचा.” अशोक आजही शांतपणे तिला सॉरीच म्हणाला. छोटा अमोघ सर्व ऐकत होता. तो धावतच यामिनिकडे…

100 Words Stories

२०२० जर व्यक्ती असती तर… एक कठोर शिक्षक.

२०२० मला एका कठोर शिक्षका सारख भासल. नवीन वर्ष आलं. सर्वांनी जल्लोषात स्वागतही केलं. प्रत्येक जण आपल्याच धुंदीत जगत होता.पण हे नवीन शिक्षक कठोर होते. त्यांना वाटल चला बघुया आपल्या या विद्यार्थ्यांची कठीण परीक्षा घेऊया. जीवनात अनपेक्षित प्रश्न,समस्या आल्यावर कसे वागतात ते पाहू. अनपेक्षित परीक्षेने सर्वांचीच तारांबळ उडाली. काही प्राणानां मुकले, काही नैराश्याच्या गर्तेत सापडले,…

100 Words Stories

नाश्त्याच्या टेबलावर… बालपणीची सुखद आठवण.

मम्मा, पप्पा, बहीण आणि मी अस छान चौकोनी कुटुंब होत आमचं. पप्पा सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचे, मग माझी आणि बहिणीची शाळा.सर्वांच्या वेळा वेगवेगळ्या. त्यामुळे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सुट्टीचे दिवस सोडले तर एकत्र व्हायचं नाही. म्हणूनच माझ्या मम्माचा एक अलिखित नियम होता.संध्याकाळचा नाश्ता सर्वांनी एकत्र करायचा.कितीही उशीर झाला तरी आम्ही सर्वच एकमेकांसाठी थांबून…

100 Words Stories

अमृततुल्य शिरा..

पूर्वाचे नुकतेच सिझर झाले होते. २४ तास फक्त लिक्वीड डाएट घ्या असे डॉक्टरांनी सांगितले. कसेबसे २४ तास गेले.पूर्वाला मरणाची भूक लागली होती. डिलिव्हरी माहेरी नाही तर सासरी झाली होती. त्यातच काॅम्पलिकेशनमुळे अचानक डिलिव्हरी करावी लागली. माहेर बरच दूर असल्यामुळे माहेरचे यायला सुध्दा बराच अवकाश होता.पूर्वाला काहीतरी गरमागरम नाश्ता खायची इच्छा झाली.सासूबाई तिच्या सोबत होत्या पण…

100 Words Stories

दवबिंदू

वॉकरच्या साहाय्याने चालत ती खिडकीपाशी गेली. धुक्याच्या चादरीला छिद्र पाडत सूर्याची किरणे धरणीला स्पर्श करण्यासाठी आतुर झाली होती. सूर्याच्या येण्याने खरंच वातावरण उत्साहीत झाले होते.तिची नजर समोरच्या रोपट्यावर गेली. कुठे पानांवर दवबिंदू उठून दिसत होते तर कुठे ते घरंगळून पडत होते.”माझे आयुष्य ही माझ्या हातून असेच निसटून जात आहे”,असे म्हणून ती उदास झाली.कॅन्सरने तिचे शरीरचं…