Poem

माझ्या लहानपणी..

माझ्या लहानपणी होते आमचे छोटेसे चाळीतले घर,आताच्या दोन बेडरूम टेरेस फ्लॅटला सुध्दा नाही येणार त्याची सर.त्या छोट्याश्या घरात खुप समाधान आणि समृद्धी होती.काळजी,चिंता,भीती या सर्वांची तिथे जागा नव्हती.माझ्या लहानपणी चाळ नावाची वाचाळ वस्ती नव्हती.तिथे एकमेकांना मदत करणारी,कठीण प्रसंगी धावून येणारी,आनंदात सहभागी होणारी जीवाभावाची माणसे होती.माझ्या लहानपणी प्रत्येक गोष्टीचे एक वेळापत्रक असायचे.पाणी कधी येणार,जेवायला कधी बसायचे,खेळायला…

100 Words Stories

नाश्त्याच्या टेबलावर… बालपणीची सुखद आठवण.

मम्मा, पप्पा, बहीण आणि मी अस छान चौकोनी कुटुंब होत आमचं. पप्पा सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचे, मग माझी आणि बहिणीची शाळा.सर्वांच्या वेळा वेगवेगळ्या. त्यामुळे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सुट्टीचे दिवस सोडले तर एकत्र व्हायचं नाही. म्हणूनच माझ्या मम्माचा एक अलिखित नियम होता.संध्याकाळचा नाश्ता सर्वांनी एकत्र करायचा.कितीही उशीर झाला तरी आम्ही सर्वच एकमेकांसाठी थांबून…

100 Words Stories

हिवाळा.

हिवाळा म्हटला की हॉस्टेलची आठवण येणार नाही असे होत नाही. अहमदनगर मधील लोणी येथील मेडिकल कॉलेजला माझे एडमिशन झाले. त्यापूर्वी मुंबई बाहेर कधीही न गेलेली मी सरळ साडेचार वर्षासाठी तिथे राहिले. तिथे तापमानाचा पारा अगदी ४/५° एवढा खाली घसरायचा. एवढ्या थंडीची मला सवयच नव्हती.नेमके याच दिवसात परीक्षा असायची. परीक्षा म्हटली की रात्री जागून आणि सकाळी…

100 Words Stories

दहा बाय दहाची खोली.

रमाकाकुंनी त्यांच्या चाळीतल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले होते त्यामुळे त्यांची धावपळ होत होती. ते पाहून त्यांचा मुलगा सुमेध त्यांना म्हणाला,” आई इथे अगदी एशो आराम असतानाही तुझा जीव मात्र त्या दहा बाय दहाच्या खोलीत गुंतला आहे.विकून टाक आता ते घर.”ते ऐकून काकूंच्या डोळ्यांत लगेच अश्रु तरळले. त्या सुमेधला म्हणाल्या ,” तुझ्यासाठी ती दहा बाय…

Quotes

आठवण

आई.. तू जाऊन बरीच वर्ष झाली, तरी तुझ्या सर्व गोष्टी तुझी आठवण म्हणून मी आजही जपून ठेवल्या आहेत.आयुष्याच्या कित्येक वळणावर, सुखं दुःखाच्या प्रसंगी त्याच माझ्या सोबती बनल्या आहेत. ***************************************************************************************************************************** घरातला जुना फोटोज् चा अल्बम म्हणजे आठवणींचा खजिना,कितीही वेळा पाहिले तरी मन काही भरेना. ***************************************************************************************************************************** माझ्या आठवणींचा सडा कधीतरी तुझ्या अंगणी पडेल का?माझ्या अबोल भावना व्यक्त…

Poem

आठवणीतला पाऊस..

आज पावसात भिजताना फार एकटं वाटतं होत.जुन्या आठवणींच सावट पुन्हा एकदा मनात दाटल होत.आजचा पाऊस अगदी आगंतुक पाहुण्यासारख आला, आणि माझ्या हृदयात कधीकाळी शिरकाव करणाऱ्या त्या आगंतुक पाहुण्याची मला आठवण करून गेला. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.