१) काहीपे पोहोचने के लिये कहिसे निकलाना जरुरी है..
वीस वर्षांच्या नेहाचा प्रेमभंग झाला होता.बरेच महिने होऊन ती या दुःखातून बाहेर येत नव्हती.ती जुन्या आठवणी,वस्तू हृदयाशी कवटाळून बसली होती.तिची ही अवस्था पाहून,नाईलाजाने तिच्या आई बाबांनी तिच्याशी बोलायचे ठरवले.आईने तिला समजावले.तेव्हा ती आईला म्हणाली,’आई मी खूप प्रयत्न करते आहे पण मला यातून बाहेर येताच येत नाही’, त्यावर तिचे बाबा तिला म्हणाले,’बाळा तू पूर्ण प्रयत्नच केले नाहीस. बघ तरुणाईच्या भाषेत सांगायचं म्हटल तर रणबिर कपूरचा एक डायलॉग आहे,’काहीपे पोहोचने के लिये कहिसे निकलाना जरुरी है’,अगदी तसच जो पर्यंत तू भूतकाळाच्या आठवणी,वस्तू अशा जपून ठेवशील,जो पर्यंत त्या तुझ्या सामोरं असतील तो पर्यंत तू आयुष्यात पुढे जाऊच शकणार नाही. नेहाला सुध्दा बाबांचे म्हणणे पटले आणि तिने त्या सर्व वस्तू स्वतःपासून दूर करण्याचा निर्णय घेतला.
२) अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है..
श्रीधरचे राधावर खुप प्रेम होते.लग्न करेन तर हिच्याशी हे त्याने मनाशी पक्के केले होते.राधाला मनातलं सांगण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता.अशातच त्याला कळले की राधाचं लग्न ठरले आहे.तो हिरमुसला.इथे त्याचे घरचे सुध्दा त्याच्यासाठी स्थळ शोधू लागले. एकदा आई त्याच्याकडे एका मुलीचा फोटो घेऊन आली.मला लग्नच करायचे नाही असे सांगून श्रीधर अडून बसला.शेवटी त्याच्या बहिणीने अथक प्रयत्नांनी त्याला त्या मुलीचा फोटो दाखवला.तो फोटो रधाचा होता.फोटो पाहताच श्रीधरची कळी खुलली.मी लग्नासाठी तयार आहे असे तो पटकन म्हणाला.त्याचे कुटुंबीय त्याच्यावर हसू लागले.श्रीधरचे मन घरच्यांनी आधीच ओळखले होते म्हणूनच त्यांनी राधाला श्रीधरसाठी मागणी घातली होती.’अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है’,हे श्रीधरच्या बाबतीत अगदी खरे झाले होते.
३) मै हू ना …
प्रेग्नंन्सीमध्ये कॉपलिकेशन्स असल्यामुळे स्वानंदीला करीअरमध्ये ब्रेक घ्यावा लागला.डिलिव्हरी नंतर ती बाळाचे सर्व करण्यात व्यस्त झाली. करिअर ओरिएंटेड,सोशली ॲक्टिव असणारी स्वानंदी आता घराच्या चार भिंतीमध्ये वावरू लागली.तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता त्यामुळे ती अधूनमधून खूप उदास असायची.तिच्या नवऱ्याला हे सर्व कळत होत. तो सुध्दा सर्व गोष्टींमध्ये तिला मदत करून तिला स्वतःसाठी कसा वेळ काढता येईल हे पाहत असे.असेच एकदा तिच्या मैत्रिणीचा भेटण्याचा बेत ठरला.स्वानंदी खुश झाली पण दुसऱ्याच क्षणी बाळाच्या काळजीने ती अस्वस्थ सुध्दा झाली.”
मै हू ना बाळाला संभालने के लिये “,असे अगदी शाहरुखच्या स्टाइलमध्ये चुकीचे हिंदी बोलत नवऱ्याने तिला मैत्रिणीसोबत वेळ घालवण्यासाठी तयार केले.
४) आपके पाव देखे बोहोत हसीन है. इन्हे जमीन पर मत उतारियेगा …मैले हो जायेंगे.
पूजा दिवाणखान्यात स्वतःचे pedicure करत बसली होती.आजी नुकतीच देव पूजा आटपून दिवाणखान्यात आली आणि पूजा म्हणाली. ‘काय थेर करत असतेस?’
पूजा आजीला म्हणाली, “थांब गं म्हातारे तुझं पण pedicure करूया.” आजी नको नको म्हणत असताना पूजाने आजीचे pedicure केले. ते पूर्ण होतच होते आणि आजोबा बाहेरून घरी आले. पूजाने लगेच आजोबांना म्हटले,”आजोबा आजीचे पाय बघा किती छान वाटताहेत.”
त्यावर आजोबा उस्फुर्तपणे म्हणाले,’आपके पाव देखे बोहोत हसीन है. इन्हे जमीन पर मत उतारियेगा मैले हो जायेंगे.” हे ऐकून आजी अगदी लाजेने लाल झाल्या. “तुमचं आपलं काहीतरीच” म्हणतं आत निघून गेल्या.
इथे पूजा आणि आजोबा आजीच्या प्रतिक्रियेवर पोट धरून हसू लागले.
५) मै और मेरी तन्हाई,अक्सर ये बातें करते हैं तुम होती तो…
खुप महिन्यांनंतर सीमा माहेरी गेली होती. तिने समीरला फोन लावला.पण समीर कामात असल्यामुळे खुप तुटक बोलून त्याने फोन ठेवला. समीर आपल्याला मिस नाहीच करत असे मानून तिने हिरमोड करून घेतला.घरी परतल्यावर ती समीरशी नीट बोलतच नव्हती. समीरने काय झाले आहे असे विचारल्यावर ती पटकन म्हणाली मी तुला खूप मिस केलं पण तुला त्याच काय तू इथे मजेत होतास. सीमाचा रुसवा दूर करण्यासाठी समीर पटकन म्हणाला,”मै और मेरी तन्हाई,अक्सर ये बातें करते हैं तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती,तुम इस बात पे हैरां होती, तुम उस बात पे कितनी हँसती”, हे फिल्मी बोलणे ऐकून सीमाला हसू आले. हसतच तिने समीरला मीठी मारली.
६) तुस्सी जा रहे हो…
फेब्रुवारी महिन्यात आपल्या मुलाकडे राहायला आलेल्या आजी आधी लाॅकडाऊन आणि नंतर आरोग्याच्या दृष्टीने बराच काळ तिथेच राहिल्या.मुलाच्या संसारात आपली लुडबुड नको या विचारांच्या आजी पहिल्यांदाच दोन दिवसांनाच्या वर मुलाकडे राहिल्या होत्या.सर्वांच्या सहवासात आजी रमल्या.सूनेलाही सासूबाईंची सोबत पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली.
आजींचा जाण्याचा दिवस आला तेव्हा सारे मलूल झाले. आजीने जाऊ नये इथेच राहावे यासाठी सारेच गयावया करू लागले. पण आजी काही ऐकेनात.ठरल्याप्रमाणे आजी निघाल्या.छोटा सार्थक धावत आजीकडे गेला आणि आजीचा हात धरून बोबड्या बोलीत बोलला ,”तुस्सी जा रहे हो? तुस्सी ना जावो.” आणि रडू लागला.
आजीला सार्थकच्या बोलण्याने हसूही आले आणि रडूही. नातवंडांच्या मायेने आजींनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटाच्या प्रसिद्ध संवादा वरून बनवलेल्या माझ्या १०० शब्दांच्या गोष्टी, खास माझ्या वाचकांसाठी.
. समाप्त
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


