माझा दहा महिन्यांचा चिमुकला, गेले कित्येक दिवस स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्यांदा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा तो पटकन खाली पडला. त्याला रडू आले. मी त्याला जवळ घेऊन कुरवाळले. तो शांत झाल्यावर पुन्हा त्याला उभे केले. एव्हाना त्याचा विश्वास बसला होता त्याची आई त्याच्या जवळ आहे .ती त्याला काही होऊ देणार नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला,पुन्हा पडला. पण या वेळी त्याला रडू आले नाही. त्याचे प्रयत्न सुरूच होते.
काल पहिल्यांदाच तो स्वतःहुन चार पावले चालला. तो क्षण माझ्यासाठी खास होताच. पण माझ्यासोबत तोही खूप खुश झाला.आपल्याला जमलं हा आनंद त्याचा देहबोलीतून झळकत होता.
असच सर्व मुलांचं होत.पालकांच्या आधाराच,विश्र्वासच रूपांतर मुलांच्या आत्मविश्र्वासात होऊन ते हळूहळू पावलं टाकत अगदी गगनभरारी घेतात.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


