२०२० मला एका कठोर शिक्षका सारख भासल. नवीन वर्ष आलं. सर्वांनी जल्लोषात स्वागतही केलं. प्रत्येक जण आपल्याच धुंदीत जगत होता.
पण हे नवीन शिक्षक कठोर होते. त्यांना वाटल चला बघुया आपल्या या विद्यार्थ्यांची कठीण परीक्षा घेऊया. जीवनात अनपेक्षित प्रश्न,समस्या आल्यावर कसे वागतात ते पाहू. अनपेक्षित परीक्षेने सर्वांचीच तारांबळ उडाली. काही प्राणानां मुकले, काही नैराश्याच्या गर्तेत सापडले, काही प्रिय व्यक्तींना, वस्तूंना गमावून बसले.
काही विद्यार्थी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार थोडे धैर्याने, सामजास्याने वागले. आपण आपले प्रयत्न करू पुढे जे होईल ते नशिबावर सोडू,पण न डगमगता आलेल्या परीक्षेला सामोरे जाऊ असे म्हणणारे आशावादी विद्यार्शी तग धरून आहेत.
अजूनही या कठोर शिक्षकाची परीक्षा संपली नाही.चला तर मग आपणही न डगमगता आपले प्रयत्न करू.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

