Home » Marathi » 100 Words Stories » ही वाट दूर जाते…

ही वाट दूर जाते…

राखी आणि योगेश गोंडस मुलीचे आई बाबा झाले. आपल्या मुलीला आईबाबांच्या प्रेमासोबतच उत्तम संस्कार आणि शिक्षण मिळावे ही त्यांची इच्छा होती. मुलगी मोठी होत होती. तसतशी त्यांची चिंता वाढत होती. त्यांच्या बस्तीतलं वातावरण तिच्यासाठी योग्य नाही हे दोघानाही जाणवत होतं. बस्ती सोडून कुठेतरी चांगल्या ठिकाणी घर घेणे गरजेचे होते,” पण आपल्यासारखे हातावर पोट असणा-या माणसांना हे शक्य नाही “,असे योगेश राखीला हताश होऊन सांगत होता.
“आपल्या ध्येयाची वाट थोडी दूर आहे,अवघड आहे पण आपण थोडे जास्त प्रयत्न केले तर आपली मुलगी सुजाण होईपर्यंत आपण नक्कीच घर घेऊ शकतो”,असे राखीने त्याला समजावले.
राखीचे बोलणे ऐकून योगेशचेही मनोबल वाढले होते.आता ते दोघे आपल्या नवीन घरासाठी जोमाने कामाला लागले होते.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *