Home » Marathi » Stories » (?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग ३ ( अंतिम)

(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग ३ ( अंतिम)

तीन महिन्याच्या कालावधी उलटला. रेवा आणि समर एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. त्यामुळे ही बातमी जास्त वेळ लपवून ठेवणं त्यांना शक्य नव्हत. असही ही गोड बातमी लपवून ठेवायची त्यांचीही इच्छा नव्हती…

आज रेवाचा मूड जरा जास्तच खराब होता.. समरने कारण विचारले.
” अरे बाळ आपलं… निर्णय आपला.. पण लोक असे सल्ले का देतात हेच कळतं नाही..” रेवा चिडून म्हणाली.

” काय झालं..” समरने विचारले.

” अरे ती सीमा माहीत आहे ना तुला .. कॉर्नरला बसते ती.. ती चक्क मला म्हणाली, तुम्ही abortion चा विचार नाही केला..” रेवा म्हणाली.

” अरे डायरेक्ट abortion.. नक्की काय म्हणणं होत तिचं..” समरने विचारलं.

” अरे तिला वाटल unwanted pregnancy कॅरी करते आहे मी.. unplanned झालं हे सर्व.. बर चल तिला हे असं वाटलही असेल. Unplanned pregnancy असेल तरी आता आपण स्वतःहून ही बातमी सर्वांना सांगतो आहोत ना. आपण खुश आहोत.. ही pregnancy continue करते आहे मी.. मग हे abortion बद्दल बोलण्याचा अर्थ काय… अरे एखाद्या प्रेग्नंट बाई सोबत कस बोलावं काय बोलावं हे सुध्दा कळत नाही..” रेवा म्हणाली.

” दुर्लक्ष कर.. खर सांगू मला पण असे नको ते सल्ले नको ते बोलणारे बरेच भेटतात.. negative positive बरेच जण असतात.. लवकर बेबी झाल तर लाईफ संपते. अरे आधी फिरून घ्यायचं ना. एवढ्या लवकर प्लॅन कोण करत का.. जेव्हा married life मध्ये काहीच नसतं करायला तेव्हा बेबी प्लॅन करायचा असतो. अजून बरंच काही…. एका कानाने ऐकायचं.. आणि दुसऱ्या ने सोडून द्यायचं.. हे असे सल्ले देणारे बरेचदा तेच असतात ज्यांच्या आयुष्यात काही धड नसतं.. पण त्यांना लोकांना सल्ले द्यायला मज्जा येते..” समर म्हणाला..

” बरोबर म्हणालास तू अगदी .. इतर वेळी काही नाही रे.. पण हे abortion वैगरे ऐकून मला चीड आली.” रेवा म्हणाली.

” सीमाला किती मुल आहेत. ? ” समर ने विचारले.

” माझ्या माहिती नुसार एक ही नाही.. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं आहे तिचं..” रेवा म्हणाली.

” अग मग तिच्या दृष्टीने ती बरोबरच बोलली ना.. आणि आता तू बेबी ला घेऊन किती सेन्सिटिव्ह झाली आहेस याचा तिला अंदाज तरी कसा येणार. तिला जे तिच्या साठी योग्य वाटतं तेच तुझ्यासाठी ही लागू केलं तिने ” समर म्हणाला.

” रेवा तुला खरच वाटत का.. आपण घाई केली..?” समरने पुन्हा रेवाला विचारलं..

” नाही रे मुळीच नाही.. तुला वाटतं का..? रेवाने विचारले.

” नाही ग.. मला हे राईट डिसिजन वाटत.. खूप घाई केली तुम्ही… थोडा वेळ थांबायच ना.. अरे हे काय वय आहे पालक व्हायचं.. मुल झाली की लाईफ संपते. अजून असे बरेच काही बोलणारे भेटतात ग रोजच.. negative लोक आहेतच पण आपल्या या डिसिजनच कौतुक करणारे ही आहेत . माझा मित्र राजेशच बघा ना.. सांगत होता.. लग्नाला पाच वर्ष झाले पण बाळ नाही. लोक खूप विचित्र नजरेने बघतात. त्यांनी काही प्लॅनिंग वैगरे नव्हत केलं. पण कधी झालच नाही. ट्रीटमेंट सुरू आहे. बायकोला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही त्रासातून जावं लागत आहे. समाजासाठी मुल नको आहे त्यांना.. पण त्यांनाही मनापासून बाळ हवं आहे. माझी चुलत बहीण प्रिया तिचं पण तसच … प्लॅनिंग केलं.. आणि नंतर जेव्हा मुल हवं होत तेव्हा झाल नाही.. असे किती तरी जण आहेत. आणि ते आपल्या डिसिजन बद्दल positive बोलतात. मुद्दा ना मुल हा नाही आहे. बघ मुल हवं की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते कधी हवं तेही त्या कपलनेच ठरवावं, जे आपण ठरवलं. बस.. झालं मग आता.. लोक दोन्ही बाजूंनी बोलणार. आपण काही वर्ष थांबलो असतो तर हेच लोक अजून वेगळं काही बोलले असते. खर सांगू तर सुरुवातीला तर मला पण हे अपेक्षित नव्हतं की काही नेगेटीव्ह रिअँक्शन पण येतील लोकांच्या. म्हणजे बघ ना गंमत आहे तुम्ही काहीही करा पण लोक त्यांच्या एक्स्पर्ट कॉमेंट्स आणि ओपिनियन तर देणारच..” समर म्हणाला.

” बरोबर आहे रे तुझ.. खरतर मला पण अशी रिएक्शन अपेक्षित नव्हती. म्हणून कदाचित वाईट वाटत असावं. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. असो.. ” रेवा म्हणाली.

” आता आपण पूर्ण लक्ष बाळ कडे दिलं पाहिजे. बघ मला वाटत हे डिसिजन आपलं आहे तर मग जबाबदारी पण आपली जास्त आहे. आई म्हणत होती की ती इथे शिफ्ट होते म्हणून. पण मला काय वाटत जर गरज वाटली तर आपण तिथे जाऊ. तिला आता परत नवीन घरात ऍडजस्टमेन्ट नको. तू छान छान पुस्तक वाच, गर्भसंस्कार क्लासेसच बघ. व्यायाम कर. पेरेन्टींगचे बुक्स वाचू आपण.. तुझ्याही घरच्यांना या सर्वात जास्त त्रास नको द्यायला. जेवढं शक्य होईल तेवढं आपण पाहू..” समर म्हणाला..

रेवा आणि समर आता आसपासच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रतिक्रियांपासून लांब गेले होते. त्यांचं पूर्ण फोकस फक्त त्यांचं बाळ होत. कोण काय बोलत. कोणाला काय वाटतं हे त्यांच्या साठी महत्त्वाचं नव्हत.

हळूहळू रेवाच्या आईलाही त्यांचं निर्णय पटू लागला.” माझं अजून वय व्हायच्या आत ह्यांनी हा निर्णय घेतला ते बर झालं नाहीतर रेवाच सर्व करताना माझी तारांबळ झाली असती..तिचं सारं काही करणं मला जमलं असतं की नाही तेच माहीत नाही…रेवा घरात सर्वात धाकटी.. बाकीच्या लेकिंच केलं तस सारं काही साग्रसंगीतपणे हीच ही करता येईल” असा विचार रेवाच्या आईच्या मनात आला.. समर आणि रेवाचा निर्णय पटण्याची व न पटण्याची प्रत्येकाची स्वतःची अशी कारण होती..

रेवाची डिलिव्हरी झाली. घरच्यांनी खूप मदत केली. सर्वच होते त्यांच्या सोबत. पहिले तीन महिने ती तिच्या माहेरी राहिली. मग पुण्यात परत आल्यावर समर आणि त्याच्या आई बाबांनी खूप उत्तम रित्या परिस्थिती सांभाळली. सुरुवातीचा काळ बरच कठीण होता. पण दोघांनीही उत्तम रित्या निभावून नेलं. बाळाचं संगोपन करता करता स्वतःसाठी तसच एकमेकांसाठी वेळ काढणं ते विसरले नाहीत.

( ही कथा काल्पनिक आहे.. पण ही मी माझ्या अनुभवातून लिहिली आहे. आमच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला आमचं बाळ १० दिवसांच होत. रेवा आणि समर सारखच आम्हीही सर्व विचारांती हा निर्णय घेतला होता. त्यांच्या सारखच आमचं ही ठरलं होत झालं तरी ठीक नाही झालं तरी काही प्रोब्लेम नाही.. पण बाळाची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार होतो.रेवा आणि समरने अनुभवलेले कडू गोड प्रसंग आम्हीही अनुभवले.” तू मेडिकल फील्डला बिलोंग करते तरी असा डिसिजन कसा घेतला.. अरे एवढ्या लवकर.. फास्ट निघालात तुम्ही… ते अगदी abortion करायचा विचार असेल तर लवकर कर , पूर्वी चालून जायचं लवकर मुल आता लवकर मुल झालेली सूट नाही होत, अरे मज्जा कधी करणार… Etc..” अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या.. बरेचदा टिका करणारे हे असे लोक होते ज्यांना खरतर आमच्या आयुष्याबद्दल नीटसं माहित ही नव्हत. खरतर आम्ही स्वतःहून कोणाशी काही बोलायला जायचो ही नाही.. तरी कुठे कोणी भेटलं की उगीच आपले सल्ले , मत सांगत बसायचे. आम्हाला पण हे पचनी पडणं कठीण होत. काही लोक तर अगदी हसायचे.. मुळात चुकीचं अस काय केलं आम्ही हेच आम्हाला कळत नव्हत. आमचं बाळ या जगात आल आणि तीन महिन्यात कोरोना आला. जग पूर्ण थांबल. पण या सर्वात आम्ही दोघंही आमच्या बाळाला नीट वेळ देऊ शकलो. आम्ही दोघं ही आमची प्रोफेशल आणि पर्सनल लाईफ सांभाळत बाळाकडे बघत होतो आणि बघत आहोत.. मार्ग नक्कीच सोप्प नव्हता.. जागरण झाली. कधी कधी चिडचिड सुद्धा झाली.. पण आमचा निर्णय आमच्यासाठी योग्य होता हे आम्हाला माहीत होत..आणि तो योग्यच ठरला. कोरोना मुळे जग थांबल जरी नसतं तरी सुध्दा आम्हाला खात्री होती आणि आहे की आमचा निर्णय योग्यच आहे. आता अचानक आमच्यावर टिका करणाऱ्या लोकांना आमचा निर्णय योग्य वाटू लागला आहे.. या सर्वातून आम्हाला एवढं नक्की कळलं बाळाला जन्म देणं सोप्प नसतच.. तसच त्याचं योग्य रीतीने सांभाळ करणही सोप्प नसतं. त्यासाठी मानसिक , शारीरिक , आर्थिक अशी सर्व तयारी लागते. वेळ लागतो. जिद्द लागते , धैर्य लागते.. दिवसाची रात्र तर रात्रीचा दिवस करावा लागतो. बरेच बदल होतात.. काही सुखावणारे असतात तर काही अपेक्षा भंग करणारेही असतात. बाळ लग्नानंतर एक वर्षात झाल काय आणि काही वर्षांनी झाल काय या सर्व गोष्टी येतातच. लग्नानंतर वर्षभरात झाल म्हणजे ते कमी त्रास देईल , कमी जागवेल किंवा ते जास्त त्रास देईल, अस नसतं. किंवा लग्नानंतर काही वर्षांनी झाल तर ते आईच्या पोटातूनच समजूतदार होऊन येईल असही नसतं. महत्त्वाचं असतं की त्या कपलला काय हवं आहे. हल्ली अशी ही जोडपी आहेत ज्यांना मुल कधीच नको असते. तेही त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. निर्णय हा ज्याचा त्याचा , त्याच्या दृष्टीने योग्य असतो. आई बाबा होण्याचा असा योग्य मुहूर्त कुठला हे फक्त त्या जोडप्यानेच ठरवायचं असतं , घरातल्यांनी किंवा समाजाने नाही. )

समाप्त

लेख कसा वाटला हे नक्की कळवा. तुमचे काही अनुभव असतील तर ते ही शेअर करा.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *